विडिओ : हत्तीला आला राग आणि नंतर मगरीला तिच्याच भागात जाऊन चितपट केलं , बघा विडिओ

। नमस्कार ।

आपल्या सर्वांना माहीतच आहे पाण्यात हा मगरीचाच अधिकार असतो. पाण्यात मगरीशी कधीच वैर घेऊ नये असं म्हटलं जातं. जर मगर असलेल्या क्षेत्रात पाणी प्यायला आलेला एखादा प्राणी मगरीच्या तावडीत सापडला तर त्याची सुटका नाहीच. असाच काहीसा एक प्रकार घडला, पाणी पिण्यासाठी आलेल्या एका हत्तीवर मगरीने अचानक ह’ल्ला केला. पण हत्तीने बाजीच पलटवली.

पाणी पिण्यासाठी नदीवर आलेल्या हत्ती मगरीने हल्ला करताच त्या हत्तीला इतका राग आला की हल्ला करायला आलेल्या मगरीलाच त्याने चांगलीच अद्दल घडवली. मगरीच्या शेपटीला सोंडेत धरून त्याने तिला पाण्यातच आपट आपटलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओत पाहू शकाल की एक छोटा हत्ती पाण्यात उभा आहे. त्याच्या पायाजवळच एक मगर आहे.

हत्ती मगरीवर पाय देताना दिसतो आहे. मध्येच तो सोंडेने तिला फिरवतो. त्यानंतर तिची शेपटी आपल्या तोंडात धरून तिला उलटंसुलटं करून पाण्यातच आपटतो. मगरीची अवस्था इतकी भयंकर झाली आहे की तिला हलताही येत नाही. बिचारी पाण्यात तशीच पडून राहिली आहे.

हत्ती इतका संपत्प झाला आहे, की त्याने मगरीचं राज्य असलेल्या पाण्यातच तिला हरवलं आहे. पाण्यात मगर कितीही ताकदवान असली तरी हत्तीसमोर तिचं काहीच चाललं नाही हेच दिसून येतं आहे. आयपीएस अधिकारी एचजीएस धालिवाल यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शक्तिशाली आहे तेच जिवंत राहू शकतात. हाच जंगलाता नियम आहे, असं त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हत्तीने मगरीवर केलेला हा हल्ला पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. व्हिडीओ पाहून डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *