Video : हिम्मत तर बघा या कुत्र्याची , डायरेक्ट घेतला चपळ चित्त्याशीच पंगा , बघा नंतर काय घडलं…

नमस्कार…

वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता अशा हिंस्र प्राण्यांशी सामना करायचा नाही हे सर्व प्राण्यांना माहित असत. पण एका डेरिंगबाज कुत्र्याने मात्र तशी हिम्मत केली आहे. या कुत्र्याने चक्क चपळ म्हणून ओळखणाऱ्या चित्त्याशीच पंगा घेतला. या हिम्मतवान कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शांत बसलेल्या चित्त्याला या कुत्र्याने चिडवण्याचा प्रयत्न केला.

आ बैल मुझे मार किंवा आपल्याच पायावर धोंडा मारणं त्याच प्रकारचं हा कुत्रा करताना दिसतो आहे. आपल्या भागात शांतपणे बसलेल्या चित्त्याच्या जवळ जाऊन त्या कुत्र्याने त्याच्या बाजूला जाऊन त्याच्या अंगावर भुंकून, त्याला राग देण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की , चित्ता आपल्या परिसरात मस्त शांत बसून आराम करत आहे. तर त्याच्याच एरिआत घुसून त्याच्या अगदी समोर उभा राहून एक कुत्रा भुंकून त्याला डिवचताना दिसत आहे. कुत्रा फक्त त्याच्यावर भुंकतच नाही तर त्या शांत बसलेल्या चित्त्यावर ह’ल्ला करण्याचाही प्रयत्न करतो.

आपलं तोंड तो वारंवार चित्त्याच्या अंगावर नेतो. कधी त्याचे पाय तर कधी त्याची शेपटी आपल्या तोंडात धरण्याचा प्रयत्न करतो. तर मध्येच त्याच्या पाठीवरही चावण्याचा प्रयत्न करतो.

पण चित्ता मात्र अगदी शांत बसून असतो. तो कुत्र्याकडे सतत पाह राहतो. तो कुत्र्याला असं करताना पाहून पंजासुद्धा वर उचलतो. तेव्हा त्या कुत्र्याला वाटत , की आता आपलं काही खरं नाही. पण सुदैवाने चित्ता कुत्र्याला काहीच करत नाही. थोड्या वेळाने कुत्रा त्याच्यापासून दूर जातो पण तो आपलं भुंकणं काही थांबवत नाही.

बघा विडिओ :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *