VIDEO: हा मालक पुराच्या पाण्यातून बैलगाडी आणत होता आणि अचानक घडलं असं काही; मनाला चटका लावणारी घटना

। नमस्कार ।

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढत असल्यामुळे नदींना पूर आला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात मालक आणि बैलांसह बैलगाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनाला चटका लावणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तालुका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरु असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

तास येथील शेतकरी संतोष पंढरी शंभरकर शेतातून काम आटपून परत येत असताना आपल्या घरी परतत असताना वाटेत जो नाला लागतो त्या नाल्याला पूर आला होता. बैलगाडीच्या मदतीने त्या वाहत्या पुराच्या पाण्यातून वाट काढत ते येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळी पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने बैलांचे पाय जमिनीला धरुन ठेऊ शकले नाहीत आणि बघता बघता बैलगाडी पाण्यात वाहून गेली. ही दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

महिला वाहून गेली :- समुद्रपूर येथील महिला शेतातील कामे करून घरी परत येत होत्या. तेव्हा वाटेतील वाघाडी नाल्यावरील पुलावर पाय घसरला आणि ती नाल्यात पडल्यामुळे वाहून गेली. रंभाबाई नामदेव मेश्राम असं या महिलेचं नाव असून त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

20 गावांचा संपर्क तुटलेला आहे :- नदी , नाले पाण्याने ओसंडून वाहत असल्याने 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे. पोथरा नदीच्या पुराची पातळी वाढली आहे. त्या नदीच्या पुराची पातळी वाढल्यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळीच कामानिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक अलीकडच्या गावात थांबालेले आहेत.

वडगाव ते पिंपळगाव मार्गाची वाहतूक पुर्णपणे थांबलेली आहे. सायगाव्हाण, सावंगी, लोखंडी, पिंपळगाव या गावाचा संपर्क तुटलेला आहे. पिंपळगाववरून वडगाव येथे जाणा-या मार्गांवर असणारे नाले ओडसंडून वाहत असल्याने या चारही गावातील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे.

बघा विडिओ :- 

सोर्स :- लोकसत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *