Video | स्पोर्ट बाईकवर तरुणाचा थरारक स्टंट, तोल गेला अन् भलतंच घडलं, पाहा नेमकं काय झालं ?

। नमस्कार ।

आपल्याजवळ सुद्धा एखादी महागडी रेसिंग गाडी असावी अशी प्रत्येक व्यक्तीची मनापासून इच्छा असते. हे स्वप्न काही लोक प्रत्यक्षात जगतातसुद्धा. या लोकांकडे एकापेक्षा एक भारी गाड्या असतात. याच महागड्या गाड्यांवर बसून तरुण-तरुणी आपल्या जीवाची पर्वा न करता थरारक स्टंट करतात.

यावेळी असाच एक स्टंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटदरम्यान तरुणाचा बाईकच संतुलन बिघडल्याने भीषण अपघात झालाय. या अपघाताचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तरुणाचा हायवेवर थरारक स्टंट :- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण स्पोर्ट बाईकवर चालवत असून तो हायवेवरुन जात असल्याचे दिसत आहे. यावेळी तो दुचाकीचे समोरचे चाक वर हवेत उचलून स्टंट करत होता. विशेष म्हणजे एक चाक हवेत असतानादेखील व्हिडीओतील तरुण बाईक वेगात चावलत आहे. या तरुणाच्या मागे एकजण बाईक वर बसून व्हिडीओ शूट करत असल्याचे दिसून येत आहे.

अपघातानंतर तरुण रस्त्यावर फरफटत गेला :- व्हिडीओमध्ये दिसेल की तरुण स्टंट करण्यामध्ये सुरुवातीला यशस्वी झाला मात्र, थोडे अंतर पुढे गेल्यावर या तरुणाचे बाईकवरील संतुलन सुटले गेले. परिणामी हा तरुण दुचाकीवरुन खाली पडला. दुचाकी वेगात असल्यामुळे व्हिडीओतील स्टंट करत असलेला तरुणसुद्धा रस्त्यावर फरफटत गेला आहे. तरुण खाली पडल्यानंतर दुचाकी रस्त्यावर चालकाविनाच धावत आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :- व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच जीवाची बाजी लावून असे स्टंट करु नयेत, अशी प्रतिक्रिया काही नेटकरी देत आहे. वाहनांची ये-जा असलेल्या रस्त्यावर अशी स्टंटबाजी करणे चुकीचे असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

बघा विडिओ :-

 

View this post on Instagram

 

A post shared by 👑MannThigli👑 (@vip.chobbar)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *