। नमस्कार ।
काही दिवसांपूर्वी एका माकडाचा व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एक माकडाने वाघाला हुल दिली होती. भुकेलेल्या वाघाला शिकार करण्याची संधीच दिली नाही. मात्र आता त्याचा बदला पूर्ण होणार असं दिसत होत. याचं कारण म्हणजे माकडचाळे करण्याच्या नादात माकडच वाघांमध्ये फसलं आहे. त्यामुळे जगतंय की वाघाच्या तोंडात जाणार याची धाकधूक लागली आहे.
सोशल मीडियावर सध्या एका माकडाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकड झाडाच्या शेंड्यावरून वाघांना त्यांची मुद्दाम कळ काढण्याचा प्रयत्न करत होता. माकड चाळे करता करता माकडालाच घाम फुटला. 5 वाघांच्या कचाट्यात सापडलेल्या माकडाची अवस्था आणि झालेली फजिती पाहण्यासारखी आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हाय़रल होत आहे.
व्हिडीओमध्ये पाहिलंत तर दिसेल की हे माकड फांद्याच्या अगदी शेंड्याला आहे. तिथून ते लटकत आहे. वाघांना माकडचाळे करून दाखवत आहे. सुरुवातीला वाघ त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.
मात्र नंतर एक वाघ उडी मारून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मात्र माकडचाळे त्याच्या अंगाशी येताना दिसतात. या माकडाला फांदीवरही चढता येत नाही. त्यामुळे तो मधल्या मध्ये लटकत राहातो.
बघा विडिओ :-
बाघों के बीच फंसा बंदर pic.twitter.com/tvXdaqpzlT
— @Ayush_speak (@kumarayush084) August 14, 2021