। नमस्कार ।
हल्ली सोशल मीडियावर बरेचदा अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमधील काही लोकांची फजिती बघितल्यावर आपल्याला हसू आवरणार नाही. इन्स्टाग्रामवर पती पत्नीचे असे अनेक व्हिडिओ आहेत, जे पाहून तुम्हीही विचार करत बसाल. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका मुलाला आपल्या वडिलांनी केलेल्या मस्करीची शिक्षा मिळाली आहे.
सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एक अतिशय विनोदी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला किचनची सफाई करताना दिसते. शेजारीच तिचा मुलगा उभा असून तो आपला मोबाईल वर टाईमपास करत आहे. इतक्यात महिलेचा पती म्हणजेच त्याचे वडील केचअपची बाटली घेऊन किचनमध्ये येतात आणि सफाई केलेल्या जागेवर हे केचअप सांडवतो. हे वडील मस्ती करण्यासाठी केचअप खाली पाडल्यानंतर ती बाटली आपल्या मुलाच्या हातात देतात.
मुलगा आपल्या फोनमध्ये व्यग्र असल्यानं त्याला हे काहीच समजत नाही आणि काहीही विचार न करता तो ही बाटली आपल्या हातात घेतो. मात्र, आई जेव्हा किचनमध्ये केचअप पडल्याचं बघते तेव्हा प्रचंड चिडते. मागे वळून बघताच तिला आपल्या मुलाच्या हातामध्ये केचअपची बाटली दिसते.
यानंतर मुलालाच आईच्या रागाचा सामना करावा लागतो. आई त्याला मारतच किचनच्या बाहेर काढते. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 80 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर आलेल्या कमेंटही अतिशय मजेशीर आहेत.
बघा विडिओ :-
View this post on Instagram