Video ! लग्नानंतर लगेचच नववधूचे सुरू झाले नखरे, पहा पतीला स्पर्श देखील करून देईनात, खरी भानगड काय ते पहा इथे….

। नमस्कार ।

बहुतेक आई-वडील लग्नाच्या आधी मुलगा आणि मुलगी या दोघांचं मत जाणून घेतात. साखरपुड्याआधीच नवरी-नवरदेव आणि त्यांच्या घरचे अनेकदा एकमेकांची गाठभेटही घेतात. जेणेकरून एकमेकांना व्यवस्थितरित्या समजून घेता येईल.

मात्र, काही कुटुंब अशी आहेत, जिथे अजूनही मुलीचं म्हणणं ऐकून न घेताच लग्न लावलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमधील नवरीचं वागणं पाहून तुम्हाला याच गोष्टीचा अनुभव येईल.

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर सध्या एक वेडिंग व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की लग्नातील इतर कार्यक्रम पार पडल्यानंतर नवरी आणि नवरदेव जेवण करण्यासाठी बसलेले आहेत. लग्नानंतर बहुतेक ठिकाणी नवरी आणि नवरदेव आपल्या हाताने एकमेकांना जेवणातला घास भरवतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव नवरीला घास भरवत असतानाच नवरी नखरे करू लागते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल, की नवरदेव चमच्याने इडलीचा एक तुकडा तोडून नवरीला भरवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, नवरी काहीच न बोलता आपला चेहरा फिरवते. हा व्हिडिओ पाहून असं जाणवतं, की एकतर या मुलीचं जबरदस्ती लग्न केलं जात आहे किंवा मग ती कुठल्यातरी गोष्टीमुळे नाराज आहे.

मात्र, नवरीनं असं करूनही नवरदेव हसताना दिसतो. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 51 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. कमेंटमध्ये बहुतेकांनी असं म्हटलं आहे, की हे लग्न नवरीच्या विरोधात जाऊन झालेलं आहे.

बघा विडिओ :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *