Video ! या देशात कुत्र्यांना युद्धासाठी दिल जातंय खास पॅराशूट प्रशिक्षण, व्हिडियो इंटरनेट वर झाला व्हायरल…

नमस्कार…

देश विदेशात अनेक चकित करणाऱ्या घटना घडत असतात. तसच रशिया देशामध्ये चक्क कुत्र्यांना यु’द्धासाठी खास पॅराशूट प्रशिक्षण देण्यात आलं आहे. कुत्र्यांच्या या पॅराशूट प्रशिक्षण चा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टर किंवा विमान लँडिंग करणं ज्या ठिकाणी कठीण असत, अशा ठिकाणी कुत्र्यांना पॅराशूटमधून खाली उतरवण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

त्याचबरोबर तो विमानातून उडी टाकल्यावर खाली येताना कुत्रा कसा वागतो ? याचीही तपासणी करण्यात येत आहे. यामागे कुत्र्यांना यु’द्धासाठी तयार करण्याचा मुख्य उद्देश आहे. १३ हजार फुटावर असलेल्या हेलिकॉप्टरमधून पॅराशूटच्या साहाय्याने या कुत्र्यांना खाली सोडण्यात आल यावेळी त्यांच्यासोबत एक प्रशिक्षणार्थीसुद्धा होता. १३ हजार फुटावरून खाली उतरल्यानंतर कुत्र्यांना कोणतीच इजा झाली नाही आणि ते जमिनीवर उतरताच ज्या कमांड्स देतात ते फॉलो करण्यासाठी सज्ज झाले.

“या प्रशिक्षणावेळी कुत्र्यांना आठ वेळा वरून खाली आणण्यात आलं. एकदा वरून खाली आल्यानंतर त्यांना पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये नेणं खूप कठीण होतं. मात्र कुत्र्यांमध्ये तितकी भीती जाणवली नाही”, असं पॅराशूट प्रशिक्षणार्थी अँद्रे तोपोरकोव यांनी सांगितलं. त्यांना प्लेनमध्ये बसवल्यानंतर ते त्याचा आनंद लुटताना दिसत होते.

तसेच खिडकीतून खाली पृथ्वीवर बघताना त्यांना खूप आनंद होत होता. मात्र हेलिकॉप्टरमधून खाली उडी टाकताना ते घाबरलेल्या अवस्थेत असायचे. तेव्हा त्यांचा खूप गोंधळ आणि आवाजही असायचा, असंही त्यांनी पुढे सांगितलं. त्या कुत्र्यांसोबत एक प्रशिक्षणार्थी खाली उतरायचा. तो कुत्र्यांना विश्वासात घेत , धीर देत त्यांना विश्वास द्यायचा. त्यानंतरच हेलिकॉप्टरमधून उडी घ्यायचा. कारण उडी घेताना कोणतीच अडचण येऊ नये, यामागचा हा हेतू होता, असंही अँद्रे तोपोरकोव यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितले आहे की , आता या कुत्र्यांना २६ हजार फुटावरून खाली आणण्याचा त्यांचा पुढचा प्रयत्न असणार आहे. यावेळी कुत्र्यांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज देखील भासेल. पॅराशूट सिंगल आणि सोबत प्रशिक्षणार्थी असं तयार करण्यात आलं आहे. त्याचबरोबर हे प्रशिक्षण २०२१ च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल असंही सांगण्यात आलं आहे.

बघा विडिओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *