नमस्कार….
सध्याच्या धावपळीच्या जीवनात सोशल मीडियावर बऱ्याचदा लहान मुलांचे मजेशीर व्हिडिओ शेअर केले जातात आणि ते व्हायरल ही होतात. त्यापैकी काही व्हिडिओ इतके गोंडस असतात, की ते परत परत पाहण्याची इच्छा मनात आपणच तयार होते. तर, काही व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण होतात.
एक असाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुकला बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारप्रमाणेच जबरदस्त किक मारताना दिसतो. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. असं मराठी मध्ये म्हटलं जातं, की लहान मुले देवाचं रूप असतात. ते घर घर वाटत नाही जिथे लहान मुलाचा आवाज येत नाही.
जगातील प्रत्येकाचे आई-वडील स्वतःपेक्षाही जास्त आपल्या मुला-बाळांची जास्त काळजी घेत असतात. पण, बरेचदा लहान मुलांची मस्ती एखाद्याच मन जिंकून घेत असतात. काही मुलं तर अगदी लहान वयातच अशा काही गोष्टी करतात की ते पाहून सगळेच चकित होतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक लहान मुलगा बाटलीला जबरदस्त एकच किक मारून त्याचं झाकण उघडतो.
बघा विडिओ :-
Don’t mess with this kid… 🤭😂🔊 pic.twitter.com/pQecsMFGah
— Mack & Becky Comedy (@MackBeckyComedy) July 8, 2021
या मुलाची बाटलीच झाकण काढायची स्टाईल पाहून तुम्हीही चकित झाला असाल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ @MackBeckyComedy नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ३२ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या क्यूट व्हिडिओवर कमेंट करत अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत.