नमस्कार
हल्ली समाज माध्यमावर बरेच विडिओ वायरल झालेले आपण पाहता. सध्या तसाच समाज माध्यमावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्यादेखील अंगावर काटा उभा राहिल हे नक्की. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पाळणा दिसतो ज्यात लोकं पाळण्यात झुलण्याचा आनंद घेत असतात. परंतु बघता बघता हा पाळणा तुटायला लागतो आणि त्याच्या मुळापासून पडायला येतो. हा पूर्ण मृत्यूचा थरार सुरू असतानाच तेथे उपस्थित एक व्यक्ती आपली युक्ती वापरते ज्यामुळे या पाळण्यात बसलेल्या जवळजवळ १५ ते २० लोकांचे जीव वाचवते.
सुरवातीला तो पाळणा तुटलेला पाहून तिथे उपस्थित उभे असलेले लोकं घाबरून गेले. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या मिशिगन येथील ट्रॅव्हर्स सिटी येथील नॅशनल चेरी फेस्टिव्हलमध्ये ही घटना घडली आहे.
अहवालात असे म्हटले गेले आहे की, शुक्रवारी पहाटे या पाळण्यातील लोकांना बाहेर काढले गेले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु ट्विटरवर या थरारक क्षणाचा व्हिडीओ पाहून लोकांनी याला खूप शेअर केले.
सुदैवाने, तिथे उपस्थित लोकांनी हा पाळणा पडत असल्याचा अंदाज येताच ताबडतोब जाऊन त्याचा पाया धरला, हे पाहून दुसरे लोकं देखील तेथे जमा झाले आणि त्या सगळ्यांनी ते रेलिंग धरुन ठेवले. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यात यश आले.
चेरी फेस्टिव्हलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बर्याच लोकांनी हा भयानक क्षण त्यांच्या फोनमध्ये कैद केला. या व्हिडीओवर आतापर्यंत साडेचार लाख views आले आहेत. जवळपासच्या रेकॉर्डवरुन नोंद केलेला दुसरा छोटा व्हिडीओ अत्यंत भयानक आहे.
बघा विडिओ
This angle is much, much worse! Wow pic.twitter.com/2cEJK3h0ee
— philip lewis (@Phil_Lewis_) July 10, 2021