Video : पुणेमधील भीमाशंकर मंदिरात आलं पुराचं पाणी , इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली , बघा इथे

नमस्कार

राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला असून अतिवृष्टीमुळे लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

गेल्या 24 तासांपासून भिमाशंकर परिसराला पावसाने चांगलंच झोडपले आहे. त्यामुळे भीमाशंकर परिसरात भरपूर ठिकाणी पाणी साचलं आहे. मंदिराचे नूतनीकरण सुरू होते. ते नूतनीकरणचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगात होता आणि अचानक वळून पाणी मंदिरात आलं आहे.

मंदिराच्या शेजारील डोंगरातून पुराच्या पाण्याचा लोटच्या लोट येत असल्यामुळे मंदिरात पाणी जमा झालं आहे. पुणे भिमाशंकर मंदिरातील इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली गेलं आहे.

दरम्यान कोकणात मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. दरम्यान येथील अनेक गावांसोबतचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान महाड येथून दरड कोसळल्याची बातमी समोर येत आहे. यामध्ये तब्बल 30 घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये तब्बल 75 जणं गायब असल्याची माहिती समोर आली आहे.

महाड तालुका बिरवाडी पासून 14 किलोमीटरवर तळीये या गावी गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सुमारे 30 घरे गाडली गेली असून 75 लोक बेपत्ता आहेत. तळीयेच्या सरपंचांनी याबाबत माहिती दिली. या ठिकाणी NDRF ची मदत पाठविण्यात आली आहे. मात्र पावसाचा वेग कायम असल्याने मदतकार्य धीम्या गतीने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

बघा विडिओ :-

सोर्स :- News18Lokmat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *