। नमस्कार ।
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खूपच महत्त्वाचा अविस्मरणीय प्रसंग असतो. तो अजून कसा अविस्मरणीय होईल, यासाठी काही लोक काही ना काही वेगळं काहीतरी हटके करत असतात. सध्या असंच काहीतरी वेगळं करणाऱ्या एका या नवीन नवरीबाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यात नवरीबाई लग्नाआधी थेट जिममध्ये व्यायाम करताना दिसली आहे.
लग्न म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहत की नवरीचे कपडे, दागिने खरेदीची लगीनघाई असते. मेकअप, फोटोशूट याची तयारी चालू असते. या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पहाल की लग्नाआधी या नवरीबाईने थेट जीम गाठली. तिथं ती चक्क एक्सरसाइझ करताना दिसली.
Pre-wedding shoot…👇
Aaj raaz khula himmat ka……. pic.twitter.com/1d9bJDVMqa
— Rupin Sharma IPS (@rupin1992) November 19, 2021
आयपीएस अधिकारी असलेले सर रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ सामायिक केला आहे. त्यांच्या पोस्ट केलेल्या विडिओनुसार हा व्हिडिओ प्री-वेडिंग शूटचा आहे म्हणजे ही नवरी फिटनेस बद्दल जागरूक आहे आणि ती जीममध्येच प्री-वेडिंग शूट करताना दिसत आहे. हिमतीचं आज गुपित उलगडलं असं मजेशीर कॅप्शनही त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत पाहिल्यानंतर तशाच मजेशीर प्रतिक्रियाही येत आहे. काही नेटिझन्सनी या नवरीचं कौतुकही केलं आहे.
View this post on Instagram
नटूनथटून आपल्याच pre wedding दिवशी नवरीने पुशअप्स मारल्या. त्यातही विशेष म्हणजे लग्नाचा लेहंगा म्हटला की तो इतका जड असतो की सावरून साधं चालणंही शक्य होत नाही. पण याच लेहंग्यावर ही नवरी पुशअप्स मारताना दिसली. त्यामुळे तिचं जास्तच कौतुक वाटतं आहे.