। नमस्कार ।
वहिनी आणि दिराच नातं हे शब्दात मांडणं अशक्यच. कधी ते भाऊ – बहीण असतात, कधी माय-लेक आणि कधीकधी मात्र मित्रमैत्रिणी. बहुतेक मुलींना सासरी नवऱ्यानंतर सर्वात जवळचं कोण असतं तर तो म्हणजे दीर. त्यांच्या नात्यात कोणतंही बंधन नसतं. फक्त मजा, मस्ती आणि मस्करी. अशाच वहिनी आणि दिराचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सासरच्या ठिकाणी वहिनी सर्वात मोकळेपणाने कुणासोबत वागत असेल तर ती म्हणजे आपल्या दिरासोबत. मग त्याच्यासोबत डान्स करतानाही ती मागेपुढे पाहत नाही. बिनधास्त त्याच्यासोबत गाण्यांवर थिरकते. अशाच डान्स करणाऱ्या वहिनी आणि दिराच्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकाल की, वहिनीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तर दिराने फॉर्मल शर्ट पँट घातलं आहे. दोघंही अशा वेशात डीजे फ्लोरवर डान्स करताना दिसत आहे. दोघांनीही डीजेवर जबरदस्त ठुमके लगावले आहेत. वहिनीला आनंदात नाचताना पाहून दिरालाही तितकाच उत्साह वाटतो आहे. तोसुद्धा जोशात नाचत वहिनीला एकप्रकारे प्रोत्साहनच देतो आहे.
अंकित जंगिदने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. वहिनी-दिराची ही भन्नाट जोडी सर्वांना आवडली आहे. त्यांचा हा डान्सही सर्वांना आवडला आहे. व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
तुम्ही सुद्धा बघा विडिओ :-