Video : ऑनलाइन क्लास बंद झाल्यामुळे आता परत शाळेत जावं लागणार म्हणून या मुलीची नौटंकी बघा , मजेदार विडिओ एकदा बघाच

। नमस्कार ।

सध्याच्या कोरोना महामारी असल्यामुळे संपूर्ण ठिकाणी लॉकडाऊन लागलं आहे. त्यामुळे सर्व शाळासुद्धा बंद आहेत हे आपल्याला माहीतच असेल. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिकवले जात आहे.

मात्र, काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे तेथील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला जात आहे. लहान मुलांना आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे दररोज शाळेत जावे लागणार आहे. याच शाळेत जाऊन शिकण्यावर अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सध्या व्हायरल होत असलेला हा विडिओ तर अगदीच मजेशीर आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी शाळेत जाण्यास स्पष्ट नकार देत आहे. आणि शाळेत न जाण्यासाठी ती चांगलेच बहाणे करत आहे. हा व्हिडीओ सध्या एक चर्चेचा विषय ठरला आहे.

मुलीला आता शाळेत जावेसे वाटत नाहीये :- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तिची शाळा सुरु झालेली आहे. मात्र, ती जवळपास गेले वर्षभर घरी बसूनच लेक्चर अटेंड करत असल्यामुळे या मुलीला आता शाळेत जाऊन अभ्यास करावासा वाटत नाहीय.

तसेच परीक्षेमध्ये गुगलची मदत घेऊन प्रश्नपत्रिका सोडवता येते म्हणून तिला शाळेचे सर्व तास सध्या जसे ऑनलाईन पद्धतीने आहेत तसेच ते चालू राहावेत असे वाटत आहे. तसेच परीक्षादेखील ऑनलाईनच झाली पाहिजे असे ती म्हणत आहे.

शाळेत जावे लागेल म्हणून चिमुकली रडण्याचे बहाणे करत आहे :- तर दुकरीकडे या मुलीची आई तिला शाळेची तयारी करून तिला शाळेत जायला सांगत आहे. लवकरच शाळेत तुझे क्लास सुरु होतील त्यामुळे तू पटकन उठ आणि तयार हो असे ती म्हणत आहे. पण तरीही शेवटी त्या मुलीला शाळेत जायला लागणारच आहे हे कळल्यावर ती रडण्याची चांगलीच acting करत आहे. तसेच माझा श्वास कोंडत आहे आहे. मला सर्दी , खोकला झालाय , मला कोरोना सुद्धा झाल्यासारखे वाटत आहे, असेही मुलगी मजेदारपणे म्हणत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :- चिमुकलीची ही सर्व नौटंकी तिच्या आईने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत कोणतीच अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या विडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा आयपीएस अधिकारी Rupin Sharma यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला शेकडो लाईक्स मिळत असून मजेदार कमेंट्स ही येत आहेत.

बघा विडिओ इथे :- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *