Video ! अस्वलासमोर वाघोबाची झाली मांजर, शिकारीचा रुबाब उतरला अन मृत्यूला घाबरून पळता भुई झाली थोडी झाली, व्हिडीओ एकदा बघाच

। नमस्कार ।

नुकताच एक माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होता. ज्यामध्ये माकड 5 वाघांशी आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. आता पुन्हा एक शिकारीचा थरार दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यावेळी देखील वाघाला शिकार तर मिळाली नाहीच पण आपला जीव वाचवण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन पळावं लागलं.

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की दबक्या पावलानं वाघोबा अस्वलाची शिकार करायला जातो. वाघोबाला अस्वलाची शिकार करण्याचं धाडस मात्र चांगलंच महागात पडतं. पुढे जाऊन त्याच्यावर शिकारीसाठी उडी मारणार एवढ्यात अस्वलच त्याला हुसकावतं. चिडलेला अस्वल आपला जीव वाचवण्यासाठी वाघावर धावून जातं. सोशल मीडियावर हा शिकारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत हा व्हिडीओ 12 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 1.4 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना वाघाचा प्रॅन्क अस्वलानं फारच सीरियस घेतला असं कॅप्शन दिलं आहे. तर अस्वलासमोर वाघाची मांजर झाली अशी कमेंटही एका युझरनं केली आहे. वाघ आणि अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बघा विडिओ :- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *