|| नमस्कार ||
सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, जिथे लोक आपले मनोरंजन करण्यासाठी येतात. सोशल मीडियावर प्रतिदिन अनेक विडिओ अपलोड केले जातात. पण अपलोड केलेल्या व्हिडिओमधील काही व्हिडिओ युजर्सना इतके खुश करतात की ते वायरल होतात. असाच एक विडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
हा वायरल व्हिडिओ दोन मुलांचा आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुलं चांगलीच स्टंटबाजी करत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक लहान मुलगा व त्याच्यासोबत एक मोठा(तरुण) कशी स्टंटबाजी करत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्हाला पहायला मिळेल की, मोठा मुलगा लहान मुलाला कसा फेकत आहे, झेलत आहे. तो लहान मुलाला अगदी एखादा चेंडू किंवा वस्तू असल्यासारखं फेकत आहे. आणि लहान मुलाची लवचिकता बघून तुम्हालाही खूप आश्चर्य वाटेल. लहान मुलगा जसा स्वतःला सावरत आहे, ते बघून तुम्हाला कौतुक वाटेल.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. लोकं व्हिडीओमध्ये स्टंट करत असलेल्या दोन्ही मुलांचं खूप कौतुक करत आहेत. या दोघांचं टॅलेंट बघून नेटकरी चकित होत आहेत. खूप जणांचे असे म्हणणे आहे की, या दोघांना सरकारने मदत करायला हवी. तर काहीजण म्हणत आहेत, हे टॅलेंट ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देईल. लोकं याच्या कलेचं खूप कौतुक करत आहेत.
हा वायरल व्हिडिओ सोशल मीडियावर News 18 Lokmat यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेयर केला आहे. या व्हिडिओला आतपर्यंत २.४ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओला १३ हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.