। नमस्कार ।
साप दुरून दिसला तरी कित्येक जणांचा जीव घाबराघुबरा होतो. पण काही माणसं सापासोबत असं वागतात की आपल्याला ते बघून आश्चर्य चकित व्हायला होते.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खुओ वायरल होत आहे. तो पाहून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.
कारण ह्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोब्रा (किंग कोब्रा) यासारख्या भल्यामोठ्या सापाला कोणत्याही काठी किंवा शस्त्राचा वापर न करता पकडतो. किंग कोब्रा हे जगातल्या सर्वात विषारी सापांपैकी एक आहेत. यांची प्रजाती दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात जास्त आढळून येते.
हा व्हिडिओ थायलंड मधील असून व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,काब्री भागातील एका बागेत एक भयानक कोब्रा साप जाण्याचा प्रयत्न करत होता व नंतर तो तेथील टॅंकमध्ये लपण्याचा प्रयत्न करत होता. व्हिडिओमधील किंग कोब्राचं वजन १० किलोपेक्षा जास्त होतं,तर त्याची लांबी जवळजवळ १४ मीटर आहे.
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, कोब्रा रस्त्यावर असाच फिरत होता, आणि एक तरुण त्याला थेट हाताने पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर शेयर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की,एकदा साप त्या व्यक्तीला दंश करण्याचा प्रयत्न करतो.
सुदैवाने त्याचा वार फुकट जातो. थोड्याच वेळात तो व्यक्ती सापाला सहजरित्या पकडतो व त्याला जंगलात सोडून देतो. असे म्हटले जात आहे की तो त्याच्या साथीदाराच्या शोधात आला होता. कारण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हल्लीच एका कोब्राला मारलं गेलं होतं.