घराच्या अंगणात घुसला साप , पुढे जे या महिलेने कृत्य केलं ते पाहून होतोय कौतुकांचा वर्षाव , बघा विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडियावर दररोज असे काही व्हिडिओ व्हायरल होतात जे सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक साप घरात शिरताना दिसतो. मात्र, घरात असलेल्या महिलेची नजर या सापावर पडते.

बहुदा साप पाहून अनेकांची घाबरगुंडी उडते आणि लोक जोरात ओरडून सापावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या महिलेनं जे काही केलं ते पाहून सगळेच तिचं कौतुक करत आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसतं, की समोर सापाला पाहूनही ही महिला एकदम शांत आहे. तिच्या चेहऱ्यावर अजिबातही भीती दिसत नाहीये. महिला हातात काठी घेऊन अगदी शांतपणे या सापाला बाहेर काढत आहे. यानंतर साप घरातून बाहेर निघतो. सुरुवातीला अनेकांनी वाटलं की महिला या सापाला मारत आहे.

मात्र, ती सापाला सुरक्षितपणे घरातून बाहेर काढण्यासाठी काठीचा वापर करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिजिओ सुप्रिया साहूनं पोस्ट केला आहे. सुप्रिया आयएएस आहेत. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, की ही महिला कोण आहे माहिती नाही. मात्र, ती तीन C चा वापर करून या सापाला हाताळत आहे. कूल, काल्म आणि कॉलेक्टेड. आपल्याला अशा आणखी लोकांची गरज आहे जे वाइल्डलाइफचा सन्मान करतात.

याशिवाय इतरही अनेकांनी कमेंट करत या महिलेचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींनी सांगितलं, की हा कोब्रा साप होता. हा जगातील सर्वाधिक घातक सापांपैकी एक आहे.

एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की जर तुम्हाला कुठे साप दिसले तर त्यांना मारण्याऐवजी तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आणखी एकानं लिहिलं, की साप घातक असले तरीही आपण त्यांच्यासोबत चुकीचं कृत्य नाही केलं पाहिजे, कारण हे आपल्यासाठीही घातक ठरू शकतं.

बघा विडिओ :- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *