ही चिमुकली गंगुबाई झाली मोठी , आता दिसते एखाद्या सुंदर अभिनेत्रीसारखी , बघा इथे

नमस्कार मित्रांनो

मराठी मनोरंजन क्षेत्रात गंगुबाई या नावाने प्रसिद्ध झालेली बालकलाकार सलोनी दैनी आता तिच्यात खूपच बदल झाला आहे. १९ जूनला तिचा २१ वा वाढदिवस होता तर तिला अजूनही तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत. सांगायची गोष्ट म्हणजे सलोनीने गेल्या दीड वर्षात चक्क २२ किलो वजन कमी केले असून ती प्रचंड स्लीम अँड ट्रीम दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saloni (@salonidaini_)

सलोनी प्रचंड ग्लॅमरस झाली असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. हल्ली सलोनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

ती तिचे फोटो, रिल्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फोटो पाहून तिच्यावर लाईक्स , कमेंट्स आणि शुभेच्छांचा जास्तच वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saloni (@salonidaini_)

सलोनी सांगते की , ती लहान असताना तिच्या स्थूल असलेल्या शरीरावरुन लोक मला नेहमीच चिडवायचे. एवढेच नव्हे तर तिला हत्तीचं पिल्लू देखील म्हणायचे. कारण माझ्या वयाच्या इतर मुलींच्या तुलनेत मी थोडी जाड होते. शिवाय माझी उंची देखील खूपच कमी होती.

त्यामुळे कॉमेडी करत असताना माझ्या स्थूल शरीरावरून खूपदा विनोद केले जात होते. मी ते ऐकून कॅमेऱ्यासमोर हसत असली तरी आतून मला खूप वाईट वाटत होते. त्यामुळे मी माझं वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. असे तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saloni (@salonidaini_)

सलोनीने व्यायाम आणि डाएट करून जवळजवळ २२ किलो वजन केवळ दीड वर्षात कमी केले आहे. सलोनीने २००८ साली ‘छोटे मिया‘ या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.

या शोमध्ये ती गंगूबाई हे पात्र साकारायची. तिची ही अभिनय केलेली व्यक्तिरेका त्यावेळी तुफान गाजली होती आणि लोकांनाही खूप आवडली होती. आजही तिला गंगूबाई या नावानेच जास्त ओळखले जाते. त्यानंतर तिने ‘रावी‘, ‘नमुने‘, ‘बडे भैया की दुल्हनिया‘, ‘टेडी मेढी फॅमेली‘, यह जादू है जिन्न का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *