। नमस्कार ।
सोशल मीडियावर रोज काही न काही फेमस होत असत. तऱ्हेतऱ्हेच्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकल्या मुलाचा असाच एक मजेशीर आणि मनाला भावणारा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चिमुकल्याने गाण्यावर केलेले हावभाव पाहणाऱ्यांना भावले :- आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही हे सर्वांनाच ज्ञात आहे. कोणत्या व्यक्तीमध्ये कोणती कला असेल हे कोणालाही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियामुळे असे वेगवेगळी कला असलेली लोक आपली कला दाखवताना आपल्याला नेहमीच दिसत असतात.
मात्र, सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हा काही डान्स शिकलेल्या मोठ्या माणसाचा नाही तर हा व्हिडीओ एका छोट्या चिमुकल्याचा आहे. त्याने केलेला हा डान्स सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या गाण्यावर डान्सदरम्यान या चिमुकल्याने केलेले आपले हावभाव आणि डान्स करतानाची त्याची आत्मीयता पाहणाऱ्यांच्या मनाला चांगलीच भावली आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे ? सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ आपला मू़ड एकदम फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा मजेदार डान्स करताना दिसेल. एक हात वर करुन तो आकर्षक पद्धतीने डान्स करतोय. डोळे लावून तालावर ठेका धरण्याची या लहान मुलाची पद्धत नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :- दरम्यान, हा व्हिडीओ कुठचा आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूपच खुश झाले असून त्यावर मजेदार अश्या कमेंट च्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला सध्या फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर उत्स्फूर्तपणे शेअर केले जात आहे.
पहा व्हिडीओ : –
हा पोरगा म्हणजे निखळ आणि निर्भेळ आनंद..!#Dance #Dancer @TV9Marathi pic.twitter.com/oFL92Qyr8i
— prajwal dhage (@prajwaldhage100) July 22, 2021