भर लग्नमंडपातच नवरी-नवरदेवाचा तो डान्स पाहून पाहुणे थक्क; जबरदस्त VIDEO होतोय व्हायरल

। नमस्कार ।

सोशल मीडियावर बऱ्याचदा लग्नसमारंभातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. यातील काही व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. काही व्हिडिओ तर इतके विचित्र असतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात नवरदेव आणि नवरी एका गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहेत.

लग्नसमारंभात सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र नवरदेव आणि नवरीच असतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. लग्नसमारंभादरम्यान डान्स आणि गाण्यांच्या कार्यक्रमानं वातावरण आणखीच प्रसन्न वाटतं. आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील आपल्याच लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या एका नवरीचा असाच एक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यात ती सपना चौधरीच्या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव आणि नवरीबाई हरियाणवी सिंगर सपना चौधरीच्या प्रसिद्ध ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की हे दोघंही मोठ्या आनंदात आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. अनेक यूजर्सनं यावर कमेंट करत प्रतिक्रियाही दिली आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं आहे, की हे दृश्य खरच खूप सुंदर आहे. बहुतेक 36 च्या 36 गुण मिळले आहेत. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की असा मजेदार डान्स मी आजपर्यंत पाहिला नाही. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनं नवरदेव आणि नवरीचं कमेंट करत कौतुक केलं आहे.

बघा विडिओ :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *