नमस्कार
आई ही आईच असते : मग ती माणसाची असो वा कोणत्याही प्राण्याची. असाच एक विडिओ आहे जो आपल्या मुलाला वाचवण्यासाठी म्हशीचा सिंहांशी भांडण, व्हायरल झाला व्हिडिओ.
आई हे शौर्य आणि धैर्य यांचे प्रतीक आहे आणि आईसारखे मुलाचे संरक्षण कोणीही करू शकत नाही. आई केवळ मानवांसाठीच नाही तर प्राण्यांसाठीही स्वतःचा जीव देण्यास तयार असतात.
अशी प्रवृत्ती जनावरांमध्येही आहेत. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक म्हैस आपल्या मुलाचे प्राण सिंहाच्या कळपातून वाचवत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक म्हैस त्याच्या रेडकाबरोबर फिरताना दिसत आहे. त्याचवेळी सिंह अचानक मागून हल्ला करतो. म्हैस आणि तिचे रेडकू सिंहांनी वेढलेली असतात. दरम्यान, आपल्या रेडकला वाचविण्यासाठी शूर म्हैस त्यांचा एकटीच सामना करते.
हा व्हिडिओ आयएफएस सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच “आईचे धैर्य.” असे शीर्षक त्यांनी दिले. हा व्हिडिओ शेयर केल्यापासून तो २८ हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर ५०० वेळा पुन्हा ट्विट केला गेले आहे.
आईला ‘एकमेव सर्वव्यापी संरक्षक‘ असे संबोधून बर्याच लोकांनी आई म्हशीच्या धैर्याला सलाम केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “आईच्या प्रेमाची आणि सामर्थ्याची तुलना नाही.”
दुसर्याने टिप्पणी दिली की, “आई असल्याने आपण सामर्थ्याबद्दल शिकत आहोत.”‘
बघा विडिओ
Mother’s courage👌
Shared by NIFL pic.twitter.com/V7kjvOLv5f— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 8, 2021