। नमस्कार ।
आई ही आईच असते, मग ती माणसाची असो वा कोणत्याही प्राण्याची आई असो. आईच्या प्रेमापुढे जगातील प्रत्येकाचे प्रेम , माया कमीच असते. आई ही आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या काळजीपोटी प्रत्येक वेदना सहन करण्याची तयारी दर्शवते व ते सहनही करते.
आपल्या आयुष्यातील आनंदाची आणि दु:खाची काळजी न करता आई आपल्या मुलांच्या आनंदाची काळजी घेते. सोशल मीडियावर हल्ली प्राण्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात.
सध्या इंटरनेट वर असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या वायरल व्हिडीओमध्ये
opossum आई आपल्या पाठीवर सहा पिल्लांना घेऊन भिंती वरून चालण्याचा प्रयत्न करत आहे.
हा व्हिडीओ बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कधीकधी मातृत्वाची शक्ती निसर्गाच्या नियमापेक्षाही जास्त असते.
या विडिओ मध्ये पाहू शकाल की Opossum प्रकारच्या प्राणी आईने आपल्या पाठीवर ५ मुलांना घेऊन ती अन्नाच्या शोधात फिरत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना आवडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकरी चांगलाच शेअर करत आहेत. या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोक म्हणत आहेत की, माणूस असो वा प्राणी, प्रत्येक आईसाठी तिची मुलं जीवणापेक्षा अधिक प्रिय असतात.
बघा विडिओ :-
“Sometimes the strength of motherhood is greater than natural laws.”
Mother Opossum with 5 babies at her back pic.twitter.com/xivua3Iu6W— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 24, 2021