। नमस्कार ।
शिकार करणारा प्राणी नेहमीच आपल्या भक्ष्याच्या शोधात फिरत असतात आणि जेव्हा संधी भेटते तेव्हा क्षणाचाही विलंब न करता आपल्या त्या भक्षावर झडप घालतात. हे प्राणी शिकारीसाठी चपळपणा आणि हुशारी या दोन्हीचा वापर करतात. विशेषतः वाघ, सिंह, चित्ता यासारख्या प्राण्यांच्या शिकारीचा अंदाज तर पाहण्यालायकच असतो.
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले जातात, ज्यात प्राणी आपली शिकार करताना दिसत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या वायरल व्हिडिओमध्ये एक भलामोठा अजगर एका पाळीव मांजरीची शिकार केलेली दिसत आहे.
ज्यांना वाइल्डलाइफमध्ये आवड असते ती माणस आपला बराच वेळ हा जंगलांमध्ये भटकंती करण्यात घालवतात. जेणेकरून त्यांना चांगले फोटो आणि व्हिडिओ मिळतील. अशाच एका खास व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, की एका अजगरानं एका पाळीव मांजराला पकडून तिला गिळणकृत करताना दिसत आहे.
या भल्यामोठ्या अजगराच्या तावडीत सापडलेलं मांजर स्वतःची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. ते करूनही त्या मांजराला काही त्या अजगराच्या तावडीतून सुटता आलं नाही. तो भलामोठा अजगर तिला हळूहळू पोटात गिळून घेत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील पीलीभीत टायगर रिजर्व येथील आहे. अजगरानं ज्या पद्धतीनं मांजराची शिकार केली आहे, ती पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
हा हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. लोकं हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण झाला असाल. अनेकांचं असं म्हणणं आहे, की त्यांनी पहिल्यांदाच अजगराला अशाप्रकारे मांजर खाताना पाहिलं आहे.
बघा विडिओ :
Python making Cat its prey pic.twitter.com/4jfnnxJIEk
— @kumarayush (@kumarayush084) July 28, 2021