|| नमस्कार ||
नुकताच इंटरनेटवर एक मनाला भिडणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक जिवंत कोळी एका महिलेच्या कानात रेंगाळताना दिसत आहे. दुर्बल हृदयाच्या लोकांनी हा भयानक व्हिडिओ तुमच्या स्वत:च्या जबाबदारीवर पहा.
सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून लोकांच्या तारा उडत आहेत. इंटरनेटवर सर्वांनाच हादरवून सोडणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या कानातून जिवंत कोळी बाहेर पडताना दिसत आहे. ज्यावेळी महिलेच्या कानातून कोळी बाहेर येत होता, त्यावेळी महिलेला वेदना होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी पुन्हा एकदा तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महिलेला कानात दुखत असल्याचे सांगण्यात येत आहे. कानात त्रास झाल्याची तक्रार केल्यानंतर महिला हॉस्पिटलमध्ये पोहोचते, तिथे तपासणीदरम्यान महिलेच्या कानात एक जिवंत कोळी बसलेला दिसला. या दरम्यान, डॉक्टर टॉर्चने कोळीवर प्रकाश टाकतात, ते पाहून कोळी हळू हळू बाहेर येतो. मात्र, कोळ्यामुळे महिलेला काही त्रास झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडिओ कर्नाटकातील असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये महिलेच्या कानात एक कोळी रेंगाळताना दिसत आहे, जो खूपच भयानक दिसत आहे. तसा हा व्हिडिओ २०१७ चा आहे, जिथे कर्नाटकात राहणाऱ्या लक्ष्मी एल नावाच्या महिलेच्या कानात कोळी घुसला होता.
Imagine finding out this is what’s causing your earache 😱🕷 pic.twitter.com/KV1aYdTXkM
— LADbible (@ladbible) December 13, 2022
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २३३.५ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनाही भीती वाटू लागली आहे. ज्या लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे ते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.