। नमस्कार ।
कोणाच्याही समोर साप दिसला तरी घाम फुटतो. काही जण साप पकडण्यात खूपच तरबेज असतात. साप म्हणजे काहीच नाही असं त्यांना वाटतं. त्यामुळे अगदी एखादी दोरी पकडावी तसे ते हातात सापाला पकडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात छोटासा साप समजून एका तरुणाने त्याची शेपटी खेचली पण त्याच्यासमोर जे आलं ते पाहून त्याला घाम फुटला.
गारूडी असलेला एक तरुण साप पकडण्यासाठी घटनास्थळी पोहोचला. दरवाजाजवळ या सापाची शेपटी होती. त्याने शेपटीला धरलं आणि सापाला खेचण्याचा प्रयत्न केला. जशी त्याने सापाची शेपटी खेचली तसा त्याला धक्काच बसला असावा.
या सर्पमित्राला जो साप छोटासा वाटत होता तो चक्क किंग कोब्रा होता. जशी त्याने त्याची शेपटी खेचली आणि त्याला ओढलं. तसा हा किंग कोब्रा त्याच्या समोर अचानक आला आणि फणा काढून उभा राहिला.
जसा कोब्रा दिसला तसा तो सर्पमित्रसुद्धा घाबरला. त्याला घामच फुटला. जी काठी सापाला पकडण्यासाठी त्याने आपल्या हातात घेतली होती तीसुद्धा भीतीने फेकून दिली आणि तो मागेच सरकला. आपली शेपटी दुमडून फक्त फणा काढून जवळपास या व्यक्तीच्या उंचीइतकाच तो दिसत होता.
मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचं सांगितलं जातं आहे. एका बाथरूममध्ये हा साप होता. जवळपास १४ फूट लांबीचा हा कोब्रा. सुदैवाने तो सर्पमित्र गारुडी वेळीच त्याच्यापासून दूर झाला. त्यामुळे त्याला काही झालं नाही. नाहीतर साप इतका रागात होता की त्याने गारूड्याला दंश केलाच असता.
How not to rescue a snake. Especially if it’s a king cobra. Via @judedavid21 pic.twitter.com/yDJ5bLevQf
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 7, 2021
आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सापाला पकडण्यापूर्वी अनेकदा विचार करावा, विशेषतः जेव्हा तो किंग कोब्रा असेल तर, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.