|| नमस्कार ||
नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शेळ्यांचे कृत्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओमध्ये शेळ्या मालकाला पाहून बेशुद्ध होण्याचे नाटक करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ हृदयाला भिडतात, तर काही व्हिडिओ लोकांना खूप हसायला लावतात.
नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बकरीचे नाटक पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये मालकाला बसलेले पाहून बकऱ्या बेहोश होण्याचे नाटक करताना दिसत आहेत.
या आश्चर्यकारक व्हिडिओमध्ये, साध्या दिसणाऱ्या बकऱ्यांच्या मजेदार कृत्याला पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या कडेला हिरवळ दिसत आहे, ज्यामध्ये काही शेळ्या आनंदाने चरताना दिसत आहेत.
दरम्यान, शेळ्या जवळ ट्रक आल्यावर त्या त्यांच्या जागी पडल्याचे पाहायला मिळेल. व्हिडीओ पाहून असे दिसते की, ट्रकमध्ये बसलेल्या मालकाला पाहून बकऱ्या बेशुध्द होण्याचे नाटक करत आहेत. हा व्हिडिओ खरोखरच मजेशीर आहे.
हा व्हिडिओ ‘व्हायरल हॉग’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सचे हसून हसून वाईट हाल झाले आहेt.
Fainting Goats Meet UPS Truck 😆🐐🚚#viralhog #faintinggoats #pets #humor pic.twitter.com/cxqLWZZKjx
— ViralHog (@ViralHog) October 19, 2022
या व्हिडिओला आतापर्यंत ५८.८ हजारहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर व्हिडिओवर लाईक्स, कमेंट्सची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. हा व्हिडीओ खूप पाहिला जात आहे आणि खूप पसंत केला जात आहे.