|| नमस्कार ||
इंटरनेटवर एक भयंकर आश्चर्यचकीत करून सोडणारा व्हिडिओ पहायला मिळत आहे, एक अजगर कोळ्याच्या जाळ्यात वाईटरित्या अडकलेला दिसत आहे. कोळी अजगराला त्याच्या जाळ्यात अडकवून त्याचा कसा गुदमवरतो, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
अजगर, ज्याचे फक्त नावचं ऐकून लोकं घाबरतात .एक कोळी त्या अजगराची शिकार करताना दिसत आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर क्षणभरही विश्वास बसणार नाही.
व्हिडिओ नक्कीच आश्चर्यचकित करेल. कोळी अजगराला आपल्या जाळ्यात कसे अडकवतो आणि नंतर तो अजगराला अडकवण्यास जाळे अधिक घनतेने विणतो, हे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते.
हा चकित करणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला ती कथाही आठवेल ज्यामध्ये एक लहान मुंगी एका मोठ्या हत्तीला धडा शिकवते. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका कोळीने अजगरसारख्या धोकादायक सापाला जाळ्यात अडकवले व त्याला त्रास सहन करायला लावला.
कोळ्याच्या जाळ्यात अजगर कसा अडकतो हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. अजगर सापळ्यातून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण सापळ्यातून बाहेर पडू शकत नाही, त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतात. व्हिडिओमध्ये कोळी वरून हळूहळू अजगराकडे जाताना दिसत आहे.
ऐसा वीडियो आज तक नहीं दिखाई दिया. Spider ने अपने जाल में अजगर को फंसा लिया. This proves that we should not under estimate any one. This is rare…
Part 1 pic.twitter.com/K1xUM0kFAZ— Vinod Kumar Jha (@vkjha62) September 7, 2022
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून युजर्सही हैराण झाले आहेत. व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. व्हिडीओ पाहून तुमचेही मन क्षणभर गोंधळून जाईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.