या आफ्रिकन मुलाचा ह्या अप्रतिम डान्स मूव्हज चा विडिओ होतोय वायरल , बघा तुम्हाला ही नक्की आवडेल

। नमस्कार ।

जगात विविध कौशल्ये असणाऱ्या मुलांची काही कमतरता नाही. अशा हुशार विविध कलागुण असलेल्या मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर रोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यापैकी काही इतके भन्नाट आणि कौतुकास्पद असतात, की आपण तो विडिओ चालू केला की ते आपल्याला प्रभावित करतात.

सध्या अशाच एका आफ्रिकन मुलाचा उत्कृष्ट नाच करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीही असच म्हणाल, की एवढ्या लहान वयात हा चिमुकला एवढ्या जबरदस्त डान्सच्या मूव्ह्ज कशा उत्कृष्टपणे साकारत आहे.

या एकाच व्हिडिओने सोशल मीडियाचा वापरकरणाऱ्या लोकांची मने जिंकली आहेत. या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुले रस्त्यात मध्ये एका मुलाभोवती घोळका करून उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, मध्यभागी उभा असलेला मूलगा अप्रतिम डान्स करत असताना दिसत आहे.

हा मुलगा एखाद्या चांगल्या डान्स टीचरकडून प्रशिक्षण घेतल्यासारखे नाचत आहे. या आफ्रिकन मुलाचा डान्स बघितल्यानंतर तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. मध्यभागी असलेल्या मुलाला पाहून बाकीची मुलेही आनंदाने नाचू लागतात, हे या व्हिडिओमध्ये बघायला मिळते.

या मुलांचा आनंद आणि नृत्य बघून इंटरनेटवरचे लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहू या…

आफ्रिकन मुलाचा हा अप्रतिम डान्सचा व्हिडिओ youtube अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्या यूझरने व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आफ्रिकन वाइब..’ व्हिडिओला लाखो व्ह्यूज आहेत.

हा व्हिडिओ बघितल्यानंतर सोशल मीडियावर लोक सातत्याने आपल्या प्रतिक्रिया कमेंट च्या माध्यमातून देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने कमेंट मध्ये लिहिले, की लहान मुले किती क्यूट असतात. त्यांना आनंदी पाहून मनही खूप आनंदी होते. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करत लिहिले, ‘हा छोटा मुलगा खरोखरच अप्रतिम डान्स करत आहे.’ दुसरा यूझर म्हणतो, ‘मीही तिथे असतो तर… या मुलांच्या आनंदात मीही सहभागी झालो असतो.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *