। नमस्कार ।
दरवाजा बाहेरून ठोठावला, आवाज दिला तरीही आई दार उघडत नाही होती, म्हणून घाबरलेल्या अवस्थेत एका 5 वर्षांच्या चिमुकलीनं थेट पो’लीस ठाण्यात जाऊन मदत मागितल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे 5 वर्षीय चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे तिच्या आईचा जीव वाचला आहे.
संबंधित त्या चिमुकल्या मुलीनं मदत मागितल्यानंतर पो’लीस त्वरीतच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संबंधित महिला म्हणजे त्या चिमुकलीची आई ग’ळफा’स घेतलेल्या अवस्थेत लटकलेली पो’लिसांना दिसली. यानंतर पो’लिसांनी क्षणाचाही विलंब न करत तिला खाली घेतल आणि पाठीवर पंप केल्यानं महिलेचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू झाला.
संबंधित घटना शुक्रवारी दुपारी नाशिक येथील गंजमाळमधील भीमवाडीत घडली आहे. संबंधित आ’त्मह’त्या करणारी महिला याठिकाणी आपला पती आणि मुलीसोबत वास्तव्याला आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी घरी कोणी नसताना त्यांनी ग’ळफा’स घेत आ’त्मह’त्येचा प्रयत्न केला आहे.
संबंधित ती महिला ग’तप्रा’ण झाली असावी असं पो’लिसांनाही प्रथमदर्शीनी वाटलं होतं. पण पो’लिसांनी तातडीनं ग’ळफा’साचा दोर कापून महिलेला खाली उतरवलं. महिलेला खाली उतरवल्यानंतर पाठीवर पंप केल्यानं त्यांचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू झाला आहे. यानंतर पो’लिसांनी तातडीनं त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
नेमकं काय घडलं? शुक्रवारी दुपारी 5 वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत होती. दरम्यान घरात कोणीच नव्हतं. हे पाहून संबंधित महिलेनं अचानक घराचा दरवाजा लावून घेतला. आईनं दरवाजा का लावून घेतला याबद्दल चिमुकलीला पुसटशी कल्पनाही नव्हती. यामुळे आईनं दार उघडावं म्हणून ती बरेच प्रयत्न करत होती. तिने दरवाजा ठोठावला, हाका मारल्या पण आतून काही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे 5 वर्षीय चिमुकलीला काय करावं काहीच सुचेना.
यामुळे संबंधित मुलीनं मदतीसाठी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या पो’लीस ठाण्यात धाव घेतली. काहीतरी करा हो, माझी आई दार उघडत नाही, अशा शब्दांत मुलीनं पो’लिसांकडे मदत मागितली. पो’लिसांनीही क्षणभरही विलंब न करत घराकडे धाव घेतली.
पो’लिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, महिलेचा दे’ह लटकलेल्या अवस्थेत आढळला. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि पो’लिसांनी तातडीनं कारवाई केल्यानं महिलेचा प्राण वाचला आहे. आणखी थोडा उशीर झाला असता, तर चित्र काहीसं वेगळं असतं, अशी भावना स्थानिकांनी बोलून दाखवली आहे.