। नमस्कार ।
कोणत्याही गोष्टीत स्वतःची आणि दुसर्यांचीदेखील सुरक्षितता बाळगणे खूप गरजेचे आहे, मग ते ठिकाण रस्ता असो किंवा खेळाचे मैदान. विशेषतः रस्त्यावरून दुचाकी किंवा फोर व्हिलर चालवताना डोक्यात हेल्मेट घालणे आणि सीट बेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण या दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यामुळे कोणत्याही अपघातात चालकाच्या जीवाला धोका कमी असू शकतो.
सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाले असतील, ज्या व्हिडिओमध्ये अपघाताच्या क्षणी वाहने अक्षरश: जागेवरून उडतात. तसेच अनेक अश्या अपघातांमध्ये वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागतो. हे अनेकदा अतिवेगवान वाहनांमध्ये दिसून येते.
त्यामुळेच आताच्या काळात रस्त्यांवर सुरक्षेचे सर्व नियम नक्कीच पाळले जातात. सोशल मीडियावर सध्या एक असाच अतिशय मजेदार व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरूण स्केटिंग करत असताना अपघाताचा बळी ठरतो.
थोडक्यात काय, तर आपली स्वतःची आणि दुसऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. कोणताही जीवाला बेतेल असा स्टंट करताना त्याचे प्रशिक्षण आधी घेणे गरजेचे असते नाही तर त्यात आपला जीव ही जाऊ शकतो. त्यामुळे डोक्यात हेल्मेट घालणे गरजेचे असल्याचे या व्हिडिओ तून शिकायला मिळते.
स्पोर्ट्स में हेलमेट और सेफ्टी गियर्स का महत्व सीखें, सिर्फ 4 सेकेंड्स में… pic.twitter.com/vrl6MN3guA
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 9, 2022
आदळला भिंतीवर :- व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वत:च्याच धुंदीत स्केटिंग करताना एका रस्त्यावर वळणामध्ये दिसते, परंतु उतारामुळे तो स्वतःचा तोल सांभाळू शकला नाही आणि थांबण्याच्या प्रक्रियेत तो खाली पडून भिंतीवर आदळतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की ती व्यक्ती आपला तोल कसा ढासळतो आणि अपघाताची शिकार बनते. तो ज्या प्रकारे भिंतीवर आदळला त्यामुळे त्याला खूप दुखापत झाली असावी. त्यामुळेच सर्वत्र सुरक्षितता आवश्यक असल्याचे सांगितले जाते.