सासरी असतो या राशींच्या मुलींचा दबदबा, त्यामध्ये तुमची तर रास नाही ना ??

। नमस्कार ।

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात नवनवीन बदल घेऊन येतो, मग ती मुलगी असू द्या किंवा मुलगा. आज आपण अशा काही राशीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या राशीच्या मुली आपल्या सासरी दबदबा निर्माण करतात.

खरंतर अशा स्त्री स्वतःचं अस्तित्व, स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येकच मुलगी करत असते. मात्र या राशीच्या मुली अगदी धबधबा म्हणजे स्वतःच्याच राज्यात निर्माण करतात, असं म्हणायला हरकत नाही. तर कोणत्या आहेत त्या राशीच्या मुली चला जाणून घेऊ या…

1.कन्या राशी : सासरी ज्या मुली दबदबा निर्माण करतात, त्यामध्ये सगळ्यात पहिली रास म्हणजे कन्या रास होय. ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीच्या मुली मोकळ्या स्वभावाची असतात. मोकळ्या बोलतात. कन्या राशीच्या मुली प्रत्येक काम स्वतःच्या इच्छेनुसार करतात. या राशीच्या मुलीचे लग्न ज्या घरात होत, त्या ठिकाणी या राणी सारखं राज्य करतात.

याशिवाय या राशींच्या मुलींना पतीची पूर्ण साथ मिळते. सासरच्या घरी त्या खूप काही करतात. इतकच नाही तर लग्नानंतरही त्या मोकळेपणाने आपली मतं मांडतात, आपल्या मतांवर ठाम असतात. कोणालाही दबत आणि घाबरत तर मुळीच नाही. स्वतःच्या मतांवर ठाम असल्यामुळेच यांचा सासरी दबदबा निर्माण होतो आणि सगळ्यात महत्वाचं पतीच्या हृदयाचा रस्ता पोटातून जातो असं म्हणतात.

या मुली उत्तम स्वयंपाक करतात आणि त्यामुळे सहजच या पतीच्या मनामध्ये सुद्धा स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण करतात.

2.वृश्चिक राशी: या राशीच्या मुली खूप चपळ आणि चालाख असतात. आपल्या मत इतरांना पटवून देण्यामध्ये या राशीच्या मुली हुशार असतात. काही करायचं ठरवलं की, त्यानंतर वृश्चिक राशींच्या मुली मागे वळून पाहत नाहीत. लग्नानंतर सासरी सुद्धा या स्वतःच्या इच्छेने जगतात.

साम-दाम-दंड-भेद असं सगळं वापरून आपलंच म्हणणं खरं करतात. लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच स्वतःचा दबदबा निर्माण करायला या राशीच्या मुली सुरुवात करतात.

3. धनु रास: या राशीच्या मुलींचा स्वभाव इतर मुलींपेक्षा थोडा वेगळा असतो. आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने या सगळ्यांची मनं जिंकतात. या राशीच्या मुलींना कोणत्याही कामात निष्काळजीपणा आवडत नाही. त्यांना प्रत्येक क्षेत्राबाबत माहिती असते.

कुठेही गेलं तरी सगळ्यांना एकत्र ठेवण्यावर या राशीच्या मुलींचा भर असतो. त्यामुळेच या मुलींना सासरच्या घरात भरपूर मान-सन्मान मिळतो आणि आपोआपच यांचा एक दबदबा निर्माण होतो.

मग तुमच्या घरात या राशीपैकी कोणी आहे का? आणि तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का? कमेंट करून सांगायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published.