श्रावण महिना विशेष- फक्त 2 थेंब दूध होईल, माता लक्ष्मी प्रसन्न…

। नमस्कार ।

       आपलं घर स्वच्छ व नीटनेटका असावा असं सगळ्यांनाच वाटतं आणि यासाठी सगळे जाण्याचा प्रयत्न करत असतात. खास करून घरातल्या स्त्रिया घराची स्वच्छता करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. घर स्वच्छ व सुंदर दिसावं यासाठी हातात झाडू घेऊन तयारच असतात. त्यामुळे संपूर्ण घरात कानाकोपऱ्यात झाडू मारत आहात, परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, कि घरातील एक अशी जागा आहे तिथे झाडूचा स्पर्श अजिबात होऊ देऊ नये त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.

      आपण घराची स्वच्छता करताना बेडरून, देवघर प्रत्येक खोली चकचकीत करतो. पण अशी एक जागा आहे ती झाडूचा स्पर्श होऊ देऊ नये.  ती जागा म्हणजे आपल्या घराचा उंबरठा होय. कारण वास्तू शास्त्रानुसार, प्रत्येक घराची मर्यादा म्हणजे उंबरठा होय आणि म्हणूनच घराची साफसफाई करताना चुकूनही उंबरठ्याला झाडूचा स्पर्श करू देऊ नये, असं म्हटलं जातं.

       झाडू म्हणजे माता लक्ष्मी आणि उंबरठा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू होय आणि म्हणूनच उंबरठ्याला कधीही झाडू मारू नये, कारण त्याला झाडू मारण्याचा अर्थ असतो आपण भगवान श्रीहरी विष्णूंना घराबाहेर जायला सांगत आहोत आणि जिथून भगवान श्रीविष्णु निघून जातात तिथून माता लक्ष्मी निघून जाते आणि मग घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. मग उंबरठा स्वच्छ कसा करायचा?, तर यासाठी एखाद्या फडक्याने तो स्वच्छ पुसून घ्यावा. पूर्वीच्या काळी घराच्या मुख्य द्वाराचे फार महत्त्व होते, त्यावेळी घरोघरच्या मुख्य द्वाराचे पूजनही केले जायचे. घराच्या दारावर गणपती बाप्पाची स्थापना केलेली असते आणि शुभ-लाभ अशी शुभ चिन्हे ही काढलेली असतात.

         रोज सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडून तो स्वच्छ धुऊन पुसून घेतला पाहिजे, त्यावर रांगोळी काढली पाहिजे. हळद- कुंकूने त्यांचे पूजन केले पाहिजे, म्हणजे घरात कोणतीही नकारात्मक प्रवेश करू शकते. उंबरठा रोज स्वच्छ केल्यानंतर लगेच त्याच्यावर 2 थेंब दूध टाकावे. त्यापेक्षा जास्त टाकू नये. परंतु रोज न चुकता 2 थेंब दूध टाकावे, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न त्याला आशीर्वाद देते असं म्हटलं जातं.

      पण त्याच बरोबर तुम्ही गुरूवारच्या दिवशी उंबरठ्याला हळदीच लेपन करून त्याची पूजा सुद्धा करू शकता. त्यांचासुद्धा तुम्हाला आर्थिक फायदा होतो, असं वास्तुशास्त्रा नुसार सांगितलं. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा एक हमखास उपाय म्हणजे घरामध्ये रोज महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा. महालक्ष्मी अष्टक म्हणायला अतिशय सोपा आहे, तुम्हाला ऑनलाइन सुद्धा हे उपलब्ध होवू शकते, ते तुम्ही ऐकून नक्कीच म्हणू शकता आणि माता लक्ष्मीची कृपा मिळू शकतात…

Leave a Reply

Your email address will not be published.