लग्नाच्या वरातीमध्ये गाणं म्हणता म्हणता गेला या महिलेचा जीव , बघा सेकंदात होत्याच नव्हतं झालं

। नमस्कार ।

जीवनात आनंद साजरा करत असताना आपल्या डोळ्यादेखत मृत्यू यावा आणि क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं… अशीच एक हृदय हेलवणारी घटना परभणी जिल्ह्यात घडली. लग्न हा प्रत्येकाच्याच जीवनातला एक अविस्मरणीय असा सुखद क्षण असतो. या क्षणाला अनेकांना आवर्जून बोलावलं जातं. लग्नात डान्स-गाण्यांचे कार्यक्रमही होत असतात.

वऱ्हाडी मंडळी तर तल्लीन होऊन वरातीत नाच करत असतात. परभणीतही डीजेच्या तालावर अशाच एका लग्नाची वरात सुरु होती. नवरदेवाच्या बहुतेक नातेवाईक-मित्रांचा जोरात जल्लोष चालू होता. या सर्वांना साथ मिळत होती गाण्याची. तिथे एक उपस्थित महिला गाण्याची साथ देत होती. वरातीत नाचत असताना रंग बाई होळीचा.. हे गाणं सुरु असतानाच अचानक मधेच गाणं थांबल आणि ती महिला जागीच कोसळली…

  गाणं गात असलेल्या या महिलेचा व्हिडिओ कुणीतरी तिच्या कलेचा गौरव करण्यासाठी शूट करत होतं. त्यामुळे तिच्यावर ओढवलेला मृत्यूचा प्रसंग कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाला. गाणं गात असतानाच अचानक गाणं थांबलं. गाणं का थांबलं हे पाहताच ती खाली कोसळली होती.

लग्नातील वरातीत जमलेले सर्व लोक धावत तिच्याजवळ गेले. त्यांना नेमकं काय झालंय, हे बघू लागले. मात्र त्यांनी तिथे कोणालाही कोणताच प्रतिसाद दिला नाही. नागरिकांनी त्वरित तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल, मात्र तोपर्यंत तिने प्राण सोडले होते.

परभणीच्या पाथरी रोड येथील राजलक्ष्मी मंगल लॉन्स येथे एका लग्नसोहळ्यात गाणं म्हणत असलेल्या संगीता गव्हाणे यांचा अशा प्रकारे भयंकर मृत्यू झाला. गाणं म्हणता असतांना अचानक खाली कोसळल्या आणि त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. क्षणात होत्याच नव्हतं झालं .

परभणीच्या नानलपेठ परिसर येथे राहणाऱ्या संगीता ह्या व्यवसायाने होमगार्ड होत्या , मात्र गाणं म्हणण्याची त्यांना हौस होती. हौसेपोटी त्या गाणं म्हणायला कार्यक्रमात जायच्या. मात्र गेल्या शुक्रवारी पाथरी रोडवरील मंगलकार्यालयातला लग्न सोहळा हा त्यांच्यासाठी शेवटचा कार्यक्रम ठरला.

आपल्या सुरेल आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि क्षणातच त्या खाली कोसळल्या . सगळ्यांनी धावपळ केली. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.