l नमस्कार l
प्राण्यांचे बरेच मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमणावर दररोज व्हायरल होत असतात. यापैकी गोंडस गोंडस कुत्र्यांचे व्हिडीओ लोकांना फारच आवडतात. क्यूट डॉगीच्या अनेक व्हिडीओना लोकांची मोठी पसंती मिळत असते. कुत्र्यांचे काही अनेक व्हिडीओ असे आहेत की पाहणारे स्वतःला हसण्यापासून आजिबात रोखू शकत नाहीत.
असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा स्केट बोर्ड वर उभा राहून रस्त्यावर स्केट करायला गेला आहे. या व्हिडीओमध्ये अस दिसत आहे की , कुत्रा ज्या प्रकारे स्केटिंग करण्याचा आनंद घेत आहे, ते पाहून तुम्हीही चकित होऊन पाहतच राहाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अस पाहायला मिळत आहे की , एक कुत्रा स्केटिंग करत असतो तेव्हा कुत्रा सामान्य माणसाप्रमाणे खाली उडी मारून स्केट बोर्डचा वेग कमी असताना तो वाढवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहणं फारच रंजक वाटत आहे. डॉगीही या स्केटबोर्डिंगचा चांगलाच आनंद घेत आहे.
कुत्र्याच्या या वायरल व्हिडीओवर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया पाहून हा व्हिडीओ डॉगी लव्हर्सना खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.
व्हिडीओ बघितल्यावर असे वाटेल की या कुत्र्याला स्केटिंगची चांगलीच ट्रेनिंग देण्यात आली आहे. ज्या प्रकारे हा कुत्रा कोणाचीही मदत घेतल्याशिवाय स्केटिंग करत आहे ते पाहणारा नक्कीच चकित होऊ शकतो. @doggosdose नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
‘स्केटर बॉय’ असा कॅप्शन देत हा व्हिडीओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने या व्हिडीओमधला डॉगी स्केटिंग करत आहे, ते पाहून बघणारे केवळ बघतच राहतील. तो इतका मजा करत आनंद घेत आहे की लोकही उत्साहाने त्याला पाहत आहेत. अवघ्या काही तासातच या व्हिडीओला १५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
एका यूजरने ‘टॅलेंटेड डॉग’ असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हालाही असेच वाटेल, की कदाचित या कुत्र्याला आईस स्केटिंगचं चांगलच शिक्षण मिळालं आहे. कारण ज्या पद्धतीनं कुत्रा कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करताना दिसत आहे, ते खरोखरच थक्क करणारं आहे. एका यूजरनं लिहिलंय, अप्रतिम व्हिडिओ, मी पहिल्यांदाच असा व्हिडीओ पाहिला आहे.