|| नमस्कार ||
सोशल मीडियावर प्रत्येक सेकंदाला अनेक व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यातले काही व्हिडिओ लोकांना इतके आवडतात की, ते व्हिडिओ खूप चर्चेत येतात, वायरल होतात. असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडं आश्चर्यच होईल.
संबंधित व्हिडिओ हा एका लहान मुलाचा आहे. ११ वर्षांचा हा मुलगा ज्याचा नाव मिरॉन आहे, तो भारतीय नसून रशियाचा राहणारा आहे. या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.
मिरॉन हा मूळचा रशियाचा राहणारा. मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की, तो व त्याच्या घरचे भारतात फक्त ६ महिन्यांसाठी आले होते. तसेच ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहत आहेत.
मिरॉन हा सध्या सिंधुदुर्गातीलच जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकत असल्याचेही सांगण्यात येत आहे. फक्त सहा महिन्यांसाठी आलेला मिरॉन आता भारतात खूपच रमला आहे. तो शाळेत इतर मुलांसारखाच राहतो, सगळ्यांसोबत खेळतो. त्याच्या आईला देखील भारतात राहायला आवडत आहे. तिने सांगितले की, तिला भारतातील खाद्यपदार्थ खूप आवडतात. तिने डाल फ्राय, पनीर मसाला, चिकन मसाला या पदार्थांचा उल्लेखही केला.
मिरॉनच्या शाळेतील शिक्षिकेचीसुद्धा मुलाखत घेण्यात आली. त्यात त्यांनी सांगितले की, मिरॉन शाळेत खूप रमला आहे, त्याला मराठी काही शब्द बोलता व वाचता येतात. तो शाळेतील पोषण आहारसुध्दा आवडीने खातो. आता त्याला परिपाठातील काही प्रार्थनाही म्हणायला येतात.
मिरॉनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर Maharashtra Times यांनी शेयर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. व्हिडीओला आतपर्यंत २ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.