ह्या मांजरीला स्पायडरमॅन सारखी भिंतीवर चढताना पाहून व्हाल चकित , म्हणाल ही तर खरच स्पायडरमॅन , बघा विडिओ

। नमस्कार ।

इंटरनेटच्या दुनियेत आपल्या सर्वांनाच भरपूर वायरल झालेले व्हिडिओ पाहायला मिळत असतात. यातील काही व्हिडिओ खूपच मजेशीर असतात तर काही आश्चर्यचकित करणारे असतात. प्रत्येकाने कधी ना कधी मांजरांना झाडावर चढताना किंवा पळताना आणि भांडताना सुद्धा पाहिलच असेल. मात्र, आता जो व्हिडिओ वायरल झाला आहे, त्यात अस दिसत आहे की मांजर झाडावर नाही तर घराच्या भिंतीवर स्पायडरमॅन चित्रपटात स्पायडरमॅन चढत असतो तशी चढत आहे.

आपल्या सर्वांना माहीत आहे की , प्लेन भिंतीवर चढणं प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही. कदाचित तुमच्यातील कितीतरी लोकांनी आतापर्यंत मांजरीला अशा पद्धतीनं भिंतीवर चढताना पाहिलं नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोबतच यावर अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हा व्हिडिओ समाज मध्यम प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आहे, दो बकलोल शेखरनं आपल्या पेजवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याने सामायिक करत असताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, वाह काय कला आहे. हा व्हिडिओ इतरही अनेक सोशल मीडिया पेजवर दिसत आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की ही मांजर लेजर लाईटचा पाठलाग करत येते आणि भिंतीवर चढते. जिथे जिथे लेजर लाईट पडेल, तिथे ती धावताना दिसते. लेजर लाईट थांबताच मांजरही भिंतीवरच थांबते.

व्हिडिओ पाहून असा अंदाज येईल की ही मांजर खूप वेळा असं करत असावी. सोबतच मांजरीला असं करताना भरपूर मजा येत आहे आणि ते पाहणाऱ्यांना सुद्धा, हेदेखील जाणवत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, ही मांजर तर स्पायडरमॅन निघाली. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, ही मांजर याबाबतीत प्रो प्लेयर आहे. सगळेच लोक हा व्हिडिओ पाहून चकित झाले आहेत. हा व्हिडिओ REDDIT वरही शेअर करण्यात आला आहे. जवळपास 14000 लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *