। नमस्कार ।
किंग कोब्रा हा सगळ्यात भ’यंकर वि’षारी सापां पैकी एक प्रकारचा साप म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या किंग कोब्रा चा दंश तुम्हाला थेट हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो. त्यामुळे सर्प मित्र सुद्धा त्यांना पकडण्यासाठी चार हात दूर राहूनच पकडण्याचा प्रयत्न करतात.
परंतु या तरुणाला मात्र तो साधा खेळ वाटत होता. ज्यामुळे हा तरुण एकाच वेळी एक नाही दोन नाही तर तीन-तीन कोब्रा सापांना आपल्या कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करत होता. जे त्याला शेवटपर्यंत जमलंच नाही.
एवढंच काय तर यामुळे त्या तरुणाची इतकी वाईट अवस्था झाली आहे की, त्याला आता रुग्णालयात ऍडमिट करावं लागलं आहे. सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. कारण यामध्ये कोब्रा साप डोळ्यांची पापणी लवते न लवते, तोच या तरुणाच्या पायाला दंश करतो.
या व्हायरल झालेल्या विडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकाल की, एक तरुण तीन कोब्रा सापांसमोर बसून त्या तीनही सापांना खेळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या तिन्ही सापांनी आपला फणा काढून त्याच्यावर चिडताना दिसत आहेत. पण तरीही त्यांना बघूनही हा व्यक्ती मागे हटत नाही आणि त्या तिघांनाही आपल्या कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यावेळी तो एका सापाला कंट्रोल करतो आणि दुसऱ्या सापाला आपल्या हाताच्या इशाऱ्यावर खेळवून व्यस्त करतो परंतु तितक्यात मात्र तिसरा साप कोब्रा डायरेक त्याच्या अंगावर उडी घालतो आणि या तरुणाच्या पायाचा चावा घेतो. त्यानंतर हा तरुण या कोब्राला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो.
Don’t try to be smart always..!#snake #sarpmitra @MahaForest pic.twitter.com/Daoxo7pftf
— Arun Sahay (@arsh_ved) March 16, 2022
@arsh_ved नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नेहमी हुशार बनण्याचा प्रयत्न करू नका.’ या क्लिपसोबत त्यांनी ‘महाराष्ट्र फॉरेस्ट’ असा टॅगही केला आहे.
ही क्लिप कधी आणि कुठे शूट करण्यात आली आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र युजर्स याला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.