ही तरुणी हौसेने करत होती घोड्याची सवारी आणि थोड्या वेळाने अचानक घडलं अस काही ….पहा विडिओ

। नमस्कार ।

कोणत्याही व्यक्तीच्या काही ना काही त्यांच्या खास आवडी निवडी असतात. या आवडीच्या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या आयुष्यात धडपड करत असतो. घोड्यावर बसून छान ऐटीत बसून सवारी करण्याची अनेकांच्या मनाची इच्छा असतेच.

ही संधी मिळाली की कोणतीही व्यक्ती आपली ही हौस पूर्ण करून घेतो. पण घोड्याची सवारी करण म्हणजे काही खायची गोष्टी नाही…असं अनेकदा आपण ऐकलल असेलच. या वाक्याला खरं ठरवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील घोडेसवारी करण्यापूर्वी एकदा तरी विचार कराल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी घोड्यावर बिनधास्त ऐटीत बसून घोडेसवारीचा आनंद घेत होती. प्रत्येक व्यक्तीचा घोड्यावर बसल्यानंतर आपोआपच स्वतःमध्ये एक रूबाब झळकताना आपल्याला दिसतो.

पण कधी कधी घोड्यावर बसल्यानंतर काही व्यक्तींना लाजिरवाण्या प्रसंगांना देखील समोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार या तरूणीसोबत घडला आहे. या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, घोड्यावर बसलेली ही तरूणी घोडेसवारीमध्ये जास्तच रमलेली दिसत आहे. पण अचानक तो घोडा जोरातच उड्या मारायला सुरूवात करतो. अचानक या घोड्याला नक्की काय झालं ? हे त्या तरुणीला लक्षातच येण्याआधीच घोडा आणखीच खवळतो.

अशा परिस्थितीत घोड्यावर बसलेली तरूणी स्वतःला कशीबशी सावरताना दिसून येतेय. पण खाली पडण्याच्या विचाराने ती घाबरून जाते. अशात घोड्याने उडी मारल्यानंतर ती थेट बाजूला असलेल्या लोखंडी जाळ्यावर जाऊन पडते.

या घटनेचं पुढचं फुटेज समोर न आल्यानं तरूणीला दुखापत झाली का, याबाबतची माहिती मिळालेली नाही. यात मुलगी सुद्धा त्या लोखंडी जाळीला घट्ट पकडून खाली पडण्यापासून स्वतःला वाचवताना दिसून येतेय. ही संपूर्ण घटना जवळच उभा असलेल्या एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केली. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

तर, काहींनी कमेंट करत या मुलीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जोशमध्ये केलेल्या घोडेस्वारीमुळे या तरुणीसोबत जे झालं ते पाहून कोणीही न शिकता किंवा काळजी न घेता घोडेस्वारी करणारच नाही. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सने हसू देखील आवरता येत नाही. या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १५ हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @ree4_reels

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *