। नमस्कार ।
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. पांवटा साहिबपासून रोहरूकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग ७०७ बडवास जवळ सुमारे ५० ते १०० मीटरपर्यंत संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे बंद झाला आहे. पांवटा, सतोन ते कमरऊ, शिफ्लाईच्या दिशेने कफोटा या पर्यायी मार्गांनी किलोड-खेरवा (उत्तराखंड) माशु-च्योग-जाखना मार्गे जाता येते.
रस्ता पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात, असे तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे. पाच जिल्ह्यांमध्ये आज पुराचा इशारा, 2 ऑगस्टपर्यंत yellow अलर्ट देण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशात 2 ऑगस्टपर्यंत पावसाचा yellow अलर्ट असून 4 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान खराब राहण्याचा अंदाज दर्शविला आहे. शुक्रवारी, चंबा, मंडी, कुल्लू, शिमला आणि सोलन या पाच जिल्ह्यांच्या काही भागात पुराचा इशारा जारी करण्यात आला आहे.
भूस्खलनाचा हा वायरल विडिओ बघा :-