। नमस्कार ।
सध्या सोशल मीडिया अस माध्यम झालं आहे त्यावर अनेक प्रकारचे विडिओ वायरल होत असतात. त्यात शिकारीचे सुद्धा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. आताच एक व्हिडिओ सोशल मीडिया साईट ट्विटर वर एक व्हिडिओ वायरल होत आहे.
भर रस्त्यात एक बिबट्या एका साळींदराची शिकार करण्यासाठी त्या साळींदराचा पाठलाग करताना एक व्हिडीओ समोर आला आहे. साळींदराला निसर्गाची देणगी म्हणजेच तिच्या स्वतःच्या रक्षणासाठी एक कवच दिलं आहे ते म्हणजे त्या साळींदराची पिसं.
त्यामुळे त्याची शिकार करणं कोणालाही सोपं जात नाही. ह्या चॅलेंज म्हणजेच त्या साळींदराची शिकार करणे बिबट्यालासुद्धा कठीण जात आहे असं दिसत आहे.
बिबट्या हा साळींदराच्या मागोमाग तिचा पाठलाग करत दबक्या पावलाने त्याची शिकार करण्यासाठी जात असल्याच व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र साळींदराने पाठीवरचे सोडलेले काटे त्या बिबट्याला लागत आहेत. बिबट्या या साळींदराची शिकार करण्यासाठी खूपच कठीण परिश्रम घेत आहे मात्र त्याला यामध्ये यश मिळत नाही.
या छोट्याशा साळींदरासमोर बिबट्याला हार मानून माघार घ्यावी लागत आहे. बिबट्या साळींदरावर हल्ला करण्यासाठी पंजा मारायला जाणार तोच त्याच्या पायाच्या पंजात काटा घुसतो. बिबट्याला तो काटा सुटत नाही. तो आपल्या पंजातील काटा काढण्याचा प्रयत्न करत राहतो आणि त्याचा फायदा घेऊन साळींदर पुढे निघून जातं आणि अश्या प्रकारे साळींदर आपला जीव वाचवून त्याच्यापासून दूर पळते.
Catch me if you can 😅 pic.twitter.com/6UXd5XS0XK
— Morissa Schwartz (Dr. Rissy) (@MorissaSchwartz) July 7, 2022
तो बिबट्या शिकार करायला तर गेला पण त्याला शिकार न मिळाल्याने निराशाच हाती आली आणि परत माघारी परतण्याची वेळ त्याच्यावर आली. एवढ्यावरच थांबलं नाही तर त्याच्या पायातही काटा घुसला. हा व्हिडीओ @MorissaSchwartz या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मला पकडण्याची हिम्मत असेल तर पकडून दाखव असं त्या व्हिडिओसोबत समर्पक असा कॅप्शन लिहिलं आहे. 40 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 1 लाख पेक्ष्या अधिक लाईक्स मिळाले आहेत.