सोशल मीडियावर आपल्याला ना ना तऱ्हेचे व्हिडिओ सतत व्हायरल झालेले दिसतात. काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात, काही व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून जातात तर काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. कारण, या व्हिडिओमध्ये एक अत्यंत मोठा अपघात होता होता टळलेला पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया वर , प्रत्यक्षात असे अपघातांचे अनेक व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिले असतील. अनेक व्हिडिओ तर असे असतात ज्यात लोक मरणाच्या दारातून नशिबाने परत आल्याचे पाहायला मिळतात.
अशा प्रकारच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते आणि अशा घटनांमधून वाचलेल्या लोकांचं जे पाहणारे असतात ते कौतुकही करतात, तसंच हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही केले जातात.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही तुम्हाला असंच काही पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं, की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा अधिक श्रेष्ठ असतो. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं, की ट्रक चालक कशाप्रकारे एका चिमुकल्याचा जीव वाचवतो.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की रस्त्याच्या कडेला एका उभी असलेल्या बस च्या मागे दोन लहान मुलं उभी आहेत. दोघंही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात समोरून एक ट्रक भरधाव वेगात तिथे येत असतो. त्या भरधाव असलेला ट्रक पाहून एक चिमुकली तर तिथेच थांबते पण दुसरा मुलगा मात्र पुढे धावतच जातो. मात्र, या मुलापर्यंत पोहोचेपर्यंत ट्रक चालकाने ज्याप्रकारे ब्रेक लगावला, तो कौतुकास्पद होता.
व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजलं असेल, की कशाप्रकारे ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने एका चिमुकल्याचा जीव वाचला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘jatt.life’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या मुलाचं नशीब खूपच चांगलं असल्याचं अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे.
बघा विडिओ खाली..
View this post on Instagram