हत्तीच्या पिल्लाची Z+ सुरक्षेसारखी असलेल्या त्यांच्या कळपाचा विडिओ पाहून नेटकरी झालेत खुश , बघा विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे अनेक प्रकारचे मजेदार व्हिडिओ दर दिवशी व्हायरल होत असतात. आता हत्तींच्या कळपाचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अस दिसून येईल की हत्तींचा एक कळप त्यांच्यातील एका लहान पिलाला आपल्या संरक्षणात घेत चालताना दिसत आहे. हे पाहून असे वाटते की, हत्ती पिलाला Z प्लस संरक्षण देण्यात आलं आहे.

हत्तीच्या या कळपाचा हा गोंडस व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हत्तींचा कळप मुलाला झेड प्लस सिक्युरिटीमध्ये कसं घेऊन जात आहे ते पाहा. या व्हिडिओने माझा दिवस बनवला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाचा वापर करणार्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओला 2100 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर सतत आपल्या प्रतिक्रियासुद्धा देत आहेत. कुणी कमेंटमध्ये गोंडस आहे, तर कोणी छोटू गणेश म्हणत आहे.

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, ‘सर्व पालकांप्रमाणे ‘ एकत्र चाला, कुणीही इकडे -तिकडे धावणार नाही’ अश्या रीतीने चालायचं ठरवलं आहे. दुसऱ्याने लिहिले, ‘हा खूप गोंडस आहे, या व्हिडिओने तर माझा दिवस बनवला.’ त्यावेळी काहींनी इमोजीज वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हा व्हिडिओ IFS सुरेंद्र मेहरा यांनी शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी IFS नंदालाही टॅग केले आहे. व्हिडिओ शेअर करताना IFS मेहराने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘खरं तर हत्ती हे प्राण्यांपैकी सर्वात सभ्य आहेत. ते कोणत्याही प्रकारच्या संघर्षात अडकत नाहीत. परंतु जर तुम्हाला हत्तींचा सामना झाला तर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. विशेषत: जेव्हा त्यांच्या कळपात पिलं असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *