। नमस्कार ।
मध्य प्रदेशमधील होशंगाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर व्हिडीओ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला चांगलाच जीवावर बेतला आहे. त्या रेल्वे ट्रॅक वर जलद गतीने येणाऱ्या मालगाडीने त्याला धडक दिली. यामुळे तरुण लांब जाऊन पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्वरीतच त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या तरुणाचा मृत्यू झाला.
तरुणाने केलेल्या या स्टंट आणि त्याच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना होशंगाबादमधील पथरोटा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी नागेश वर्मा यांनी ही माहिती सांगितली की, संजू चौरे नावाचा तरुण रविवारी सायंकाळी आपल्या वयाने लहान असलेल्या मित्राला घेऊन बैतूल रोडवरील शऱददेव बाबा रेल्वे पुलाजवळ गेला होता.
सोशल मीडियावर पोस्ट करून फेमस होण्यासाठी तो रेल्वे ट्रॅकजवळ स्टंट करून व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. यादरम्यान एक मालगाडी रेल्वे ट्रॅकवर आली. मालगाडी इतक्या जलद गतीने येत होती, की, संजूला तेथून स्वत:चा जीव वाचवून पळण्याचा वेळही मिळाला नाही. मालगाडीच्या धडकेमुळे तो लांब फेकला गेला.
आणि त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याला इटारसीच्या सिव्हील रुग्णालयात नेण्यात आलं, येथे डॉक्टरांनी त्याला तो मृत झाला अस घोषित केलं. पोलिसांनी सांगितलं की, व्हिडीओ रेकॉर्ड असताना निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे.
सोशल मीडिया के लिए पागल युवाओं को बड़ी चेतावनी है ये, ट्रेन के साथ वीडियो बना रहा था होशंगाबाद का युवक, दर्दनाक हुई मौत pic.twitter.com/0TV41g8iJL
— Pravin Dubey (@pravindubey121) November 22, 2021
व्हि़डीओ झाला व्हायरल.. रविवारी सायंकाळी झालेल्या अपघाताचा हा व्हिडीओ संजूच्या मित्राच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. आता हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.