। नमस्कार ।
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओही शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर लोकांचे मन गलबलून जाते.
तर काही व्हिडिओ खूपच क्यूट असतात, जे लोकांची मने जिंकतात. इतकंच नाही तर हल्ली या प्रकारचे व्हिडिओ लोकांना पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात.
पण, आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, तो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हालाही हसू येईल.
कारण, वानर आणि सिंह यांच्यात ज्या पद्धतीने हाणामारी होते आणि या मारामारीचे फलित, ते पाहून कोणालाही हसायलाच येईल.
तुम्ही अनेक प्राणी आपापसात भांडताना पाहिले असतील. कधी जंगलात लाइव्ह पाहिलं असेल नाहीतर व्हिडिओमध्ये तरी नक्कीच एन्जॉय केलं असेल.
कधीकधी ही मारामारी एवढी धोकादायक असते की लोक ते पाहून थक्क होतात. तर काहींना पाहून आपल्याला हसू येते.
आता व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पहा, वानर आणि सिंह यांच्यात कशी लढत होतेय. नदीकाठी झाडावर बसलेला वानर.
त्यानंतर काही सिंह तिथे पोहोचतात. वानराला पाहून सिंह झाडावर चढतो. आधी वानर घाबरतो. पण, नंतर हिंमत गोळा करतो.
सिंहावर वार करतो. मग सिंह आक्रमक होतो आणि दोघांमध्ये भांडण सुरू होते. त्याचा परिणाम काय झाला, तुम्ही व्हिडिओमध्ये स्वतःच पाहू शकता.