सापाला मुद्दामहून त्रा’स देत होता हा माणूस , तेवढ्यात सापाने घेतला चावा , बघा भी’तीदायक विडिओ

। नमस्कार ।

समाज माध्यमावर कधी काय वायरल होईल सांगता येत नाही. सध्या असाच एक सोशल मीडियावर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणारे यूजर्स चकितच झाले आहेत. हा व्हिडिओ एका सापाचा आहे, यात एक व्यक्ती सापाचं लक्ष विचलित करून त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मात्र, त्या नंतर जी काही घटना घडली ती पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला असेल.  व्हायरल झालेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं, की एक काळा साप जमिनीवरुन चालत आहे. इतक्यातच एक व्यक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो.

ती व्यक्ती त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुरुवातीला साप त्याच्यापासून वाचून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हा व्यक्ती वारंवार सापाला पकडण्यासाठी हात लावत असल्याने साप त्याला चावतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सापाने चावल्यानंतर या व्यक्तीच्या बोटांमधून रक्त येऊ लागतं. ते आपल्याला कॅमेरामध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

काही सेकंदाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर royal_pythons_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यूजरनं याला कॅप्शन देत लिहिलं की, ‘फ्लोरिडाचा हा सर्वात मोठा वाटर स्नेक आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हा साप पाहिला आहे. हा साप सहसा भरपूर रागीट असतात मात्र ते हल्ला करण्याऐवजी आपला जीव वाचवून पळण्याला अधिक प्राधान्य देतात. परंतु सापांच्या काही प्रजाती अशाही असतात ज्यांना वारंवार त्रास दिल्यास ते मागे वळून तुम्हाला चावूही शकतात. यामुळे या जीवाला त्रास न देण्यातच भलं आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Royal Pythons (@royal_pythons_)

हा व्हिडिओ पाहून काही नेटकरीही खूपच घाबरले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यापासून आतापर्यंत १८ हजारहून अधिकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, या व्यक्तीने सापाला पकडलंच का, तेही दोन वेळा. दुसऱ्या एकानं कमेंट करत लिहिलं, वाटर मोकासिन विषारी असतात. फ्लोरिडामध्ये हे साप भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *