सापाच्या नकळत मुंगूसाने केला त्याच्यावर केला हल्ला आणि पुढे…

। नमस्कार ।

 तुम्ही जेव्हा जेव्हा सोशल मीडिया च कोणतेही अँप्लिकेशन ओपन करून बघाल, तेव्हा तेव्हा तुमच्यासमोर वेगवेगळे , मजेशीर आणि मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे तुम्ही पाहताना एवढे मग्न होता की तुमचा तासन तास वेळ कसा निघून जातो, हे तुमचं तुम्हाला कळत नाही. अश्या व्हिडीओमध्ये कधी कॉमेडी, कधी प्राण्यांचे, तर कधी लग्नाशी संबंधीत काही वायरल व्हिडीओ पाहायला मिळतात.

तसेच हल्ली लोकांना इथे प्राण्यांच्या संबंधीचे देखील अनेक व्हिडीओ पाहायला आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ वायरल झाला आहे, जो साप आणि मुंगूस यांच्याशी संबंधीत आहे. साप आणि मुंगूस यांच्यातील वै’राबद्दल तुम्ही सर्वांनी कुठे ना कुठे , कधी न कधी काही तरी ऐकलं असेलच. ते दोघेही केव्हाच एकत्र राहू शकत नाहीत, म्हणूनच तर बऱ्याचदा कोणा दोन व्यक्तींमध्ये सारखी भांडणं झाली तरी देखील लोक त्यांना साप आणि मुंगूस असा संबंध जोडतात. हा व्हायरल होणारा व्हिडीओ देखील साप आणि मुंगूस यांच्या दोघांच्या भांडणाचाच आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पहाल की, एक मुंगूस एका झाडाखालून जात आहे. तेव्हा त्या मुंगूसला झाडावर एक साप असल्याची जाणीव होते, त्या सापाला पाहिल्यानंतर त्याच्यावर ह’मला करण्यासाठी हा मुंगूस त्या सापावर झडप घालतो आणि तोंडाच्या बाजूने हा मुंगूस सापाला पकडतो. ज्यानंतर या दोघांची झुंज पाहायला मिळते.

हा व्हिडीओ पाहून असे आपल्याला समजेल की , मुंगूस सापाला शिकार बनवण्यासाठी तयार होता. पण सापाला या हल्ल्याची  अजिबात खबर नव्हती. उप वन संरक्षक, नाशिक (पश्चिम) या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याला पोस्ट करताना, ‘प्राणी जितका लहान असेल तितका त्याचा आत्मा अधिक धैर्यवान असेल’ असं समर्पक कॅप्शन देखील या विडिओला दिल आहे.

हा व्हिडीओ पाहत असताना आधी असच दिसत आहे की, मुंगूसच यात विजयी झाल असेल कारण सापाला तोंडात दाबून ठेवलं आहे. परंतू नक्की पुढे काय घडलं असेल हे सांगता येणं कठीण आहे, कारण बऱ्याचदा सापाच्या विशामुळे मुंगूसाचे देखील प्राण गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *