”श्रीवल्ली” गाण्यावर या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या वर्हाड्यांचा मजेशीर डान्स होतोय खूप वायरल , बघा हा मजेशीर विडिओ

। नमस्कार ।

लग्नाची वरात म्हटलं की लोक मनाला वाटेल तसे कसेही नाचत असतात. पण हल्ली सर्वांवर साऊथ चा पुष्पा चित्रपटामधील श्रीवल्ली गाण्याची चांगलीच क्रेझ नेटकर्यांच्या मनात चढली आहे. जो तो उठ सुठ या गाण्याची सिग्नेचर (पाय लचकवत) स्टेप करताना दिसत आहे. अगदी लग्नाच्या वरातीत नाचणारे वऱ्हाडीही याला कमी एन्जॉय करत नाहीत. या एका लग्नातील वऱ्हाड्यांनी श्रीवल्ली गाण्यावर केलेला हा डान्स खूप वायरल होत आहे आणि नाचता नाचता त्यांचे अक्षरशः बेहाल झाले आहेत.

पुष्पा या चित्रपटात असलेले श्रीवल्ली गाण्यावरील हे त्या नाचाचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पाहिले असतीलच. असाच हा एक मजेशीर व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू तुम्हाला बिलकुल आवरणार नाही. तुम्ही इतकं हसाल इतकं हसाल की तुमच्या पोटात दुखेल पण हसणं थांबणार नाही.

व्हिडीओत पाहू शकाल की काही नवयुवक लग्नाच्या वरातीत नाचताना दिसत आहेत. मागे श्रीवल्ली हे गाणं लागलेलं या विडिओ मध्ये स्पष्ट ऐकू येत आहे आणि सर्वजण या गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत. प्रत्येक जण या गाण्याची ती लंगडत स्टेप आपापल्या पद्धतीने करताना दिसत आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनच्या या फिल्ममधील त्याची डान्स स्टेप कॉपी करताना दिसत आहेत.

या गाण्यावर नाच करून नाचणाऱ्या काही तरुणांचे हाल बेहाल झाल्याचेही दिसून येत आहे. कुणाची मानच लचकली, कुणाची कंबर वाकडी झाली, कुणाचे पाय दुखू लागले आहेत. हे सर्वकाही त्यांच्या एकंदर वागण्यावरून, हावभावावरून दिसून येतं.

पण तरी त्यांच्यावरील पुष्पा चित्रपटाचा फिव्हर काही कमी झालेला दिसत नाही. या अवस्थेतही त्यांनी आपला डान्स तसाच त्याच एनर्जी मध्ये सुरू ठेवला आहे. नॉनस्टॉप ते एकच स्टेप करत आहेत. @Shivaji_Dube ट्विटर अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *