नमस्कार
सोशल मीडियावर तसे अनेक तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र त्यातील काही व्हिडीओ तुमच्या कायम लक्षात राहण्यासारखे असतात तर काही व्हिडीओ असे असतात की जे तुम्ही परत परत पाहत राहता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जास्तच व्हायरल होत आहे.
हा म्हणजे एका म्हशीचा व्हिडीओ आहे. यामध्ये ही म्हैस नाचत असून मागे श्रद्धा कपूरचं प्रसिद्ध गाणं लावण्यात आलं आहे. अत्यंच सफाईदारपणे या व्हिडीओचं एडिटिंग करण्यात आलं असून लोक हा व्हिडीओ खूप लोकांनी पसंत केला आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही हसू आवरू शकणार नाही, हे नक्की.
हा व्हिडीओ वाहिद खान नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅपशन छोटी श्रद्धा कपूर असंही मजेशीर लिहिण्यात आलं आहे. सुरुवातील ही म्हस शांतपणे उभी असते त्यानंतर ती उड्या मारायला लागले. अनेकांनी त्याच्या क्रिएटीव्हीटीचं कौतुक केलं आहे.
बघा विडिओ :-
आतापर्यंत हा व्हिडीओ दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून २६ हजार लाइक्स आल्या आहेत. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहून मजा घेत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात कोणाचंही मन दुखवायचा हेतू नसतो. तर हा विरंगुळ्याचा भाग आहे. या निमित्ताने ताणात असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमलटं तर खरंच व्हिडीओ सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही.