शिकारीलाच शिकार करणे पडलं महागात , सिंहिणीनं घेतला चुकीच्या प्राण्याशी पंगा… पाहा व्हिडीओ

। नमस्कार ।

वन्य प्राण्यांचे ना ना तऱ्हेचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला व्हायरल होताना दिसत असतात. आणि हे असे विडिओ सोशल मीडिया वापरकर्ते मोठ्या आवडीने पाहतात आणि एकमेकांना शेअर करतात. त्यामुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात.

जंगलातील विडिओ , फोटो शूट मध्ये आवड असलेले कलाकार एक परफेक्ट क्लिक मिळवण्यासाठी जंगलात कित्येक तास घालवत असतात , आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे ते त्यांच्या कॅमेरामध्ये जंगलातील अनेक गोष्टी साठवत असतात आणि आपल्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर शेअर करतात.

सध्या, एक हिप्पोपोटॅमस म्हणजेच पाणगेंडा आणि सिंहिण यांच्यात झालेल्या ल’ढाईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्याला माहीतच असेल , सिंहाच्या सामोरं जाणे आणि त्याच्यासोबत झुंज घेणे म्हणजे आपणच आपल्या मृत्यूला आमंत्रण देतो अस होईल. त्यामुळे जंगलात क्वचितच असा एखाद दुसरा प्राणी असेल, जो या प्राण्याला थेट झुंज घेण्याची धाडस करेल. परंतु या व्हिडीओमध्ये सिंहिनीला पाणगेंडा झुंज देताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकाल की एक सिंहीण शेतात पानगेंड्याला एकटं पाहून त्याच्यावर हल्ला करायला जाते परंतु तिला पुसटशीही कल्पना नव्हती की, तो पानगेंडा तिच्यावरती पलटवार करेल. ज्यामुळे तिला त्याची शिकार करण्यात यश आलं नाही.

त्यानंतर त्या शिकारी सिंहिणीला हे कळून चूकलं की, तिने चुकीच्या प्राण्याशी पंगा घेतला आहे, ज्यामुळे आता तिच्या स्वतःच्याच जिवाला याच्यापासून धो’का आहे. ज्यामुळे सिंहिण तेथून काढता पाय घेण्याचा निर्णय घेते. परंतु पाणगेंडा मात्र आता तिला सोडायला तयार नसतो.

पाणगेंडा त्या सिंहिणीचे डोके त्याच्या मोठ्या जबड्यात दाबून तिला जमिनीवर आपटतो. पुढे या सिंहिणीचं काय होतं हे काही व्हिडीओत दाखवले गेले नाही. परंतु एवढं मात्र नक्की की जर या सिंहिणाचा जिव वाचला असला तर ती आयुष्या आपण केलेल्या चुकीवरती पश्चाताप करेल.

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ प्रकृति 27_12 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्यांना खूप आवडत आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 53 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर, लोक यावर सतत आपला अभिप्रायही देत ​​आहेत. बहुतेक वापरकर्ते इमोटिकॉन्सद्वारे व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *